23 November 2024 9:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स तेजीत येणार? तज्ज्ञांनी शेअरबाबत भाकीत व्यक्त केले, टार्गेट प्राईस पहा

Adani Wilmar Share Price

Adani Wilmar Share Price | अदानी समुहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स 50 टक्क्यांनी वाढू शकतात.

अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स बऱ्याच महिन्यांपासून 400 रुपये किमतीवर जवळ ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 841.90 रुपये होती. तर आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 401.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्सवर 625 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 400.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या तुलनेत अदानी स्टॉक 56 टक्क्यांनी वाढू शकतो. भारतीय एफएमसीजी क्षेत्रात अदानी विल्मर हे खूप मोठं नाव आहे.

अदानी विल्मार कंपनीची आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 58,200 कोटी रुपये कमाई होण्याची शक्यता आहे. ज्यात वार्षिक 7 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. नुवामा फर्मच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अदानी विल्मार कंपनीच्या एकूण व्यवसायात खाद्यतेल व्यवसायाचा वाटा 19.5 टक्के आहे. तर बासमती तांदूळ व्यवसायाचा वाटा 7.9 टक्के आहे. कोहिनूर मिल कंपनी ताब्यात घेतल्यानंतर कंपनीची व्यापार वाढीची शक्यता आणखी वाढली आहे.

अन्न आणि FMCG विभागात अदानी विल्मर कंपनीची द्वी वार्षिक विक्री 55 टक्क्यांच्या वाढीसह 4,000 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. खाद्यतेलांच्या किंमतीतील कपात ही कंपनीसाठी थोडी चिंतेची बाब मानली जात असली तरी, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीची प्रॉफिट मार्जिन सुधारेल, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. अदानी विल्मार कंपनीच्या पॅकेज्ड तेल आणि खाद्यपदार्थांच्या विक्रीत ग्रामीण भागाचा वाटा 30 टक्के आहे. तर अदानी विल्मार कंपनीकडे 1.8 अब्ज पेक्षा जास्त किरकोळ विक्रेत्यांचे नेटवर्क आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Wilmar Share Price today on 12 July 2023.

हॅशटॅग्स

#Adani Wilmar Share Price(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x