2024 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 160 जागा धोक्यात, निर्मला सीतारामन ते जेपी नड्डापर्यंत सर्वांना निवडणूक लढवावी लागणार? भाजपमध्ये मंथन
Lok Sabha Election 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 160 ‘कमकुवत’ जागांवर मंथन करणारा भारतीय जनता पक्ष मोठ्या मंत्र्यांनाही मैदानात उतरवू शकतो. भजोंच्या पक्षांतर्गत सर्व्हेत तब्बल १६० लोकसभा मतदासंघात भाजपचा विजय अवघड असल्याचे सर्व्हेत समोर आले आहे. परिणामी, निर्मला सीतारामन, हरदीपसिंग पुरी यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मोठी नावे लोकसभा निवडणुकीत दिसू शकतात. राज्यसभेच्या दिग्गज खासदारांवरही लोकसभा निवडणूक लढविण्याची वेळ येऊ शकते असं भाजपच्या गोटातून वृत्त आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या विषयावर सखोल चर्चा झाल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितले आहे.
नड्डा यांना देखील निवडणूक लढवावी लागणार?
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा आहे. सहसा भाजपचे पक्षाध्यक्ष लोकसभा निवडणूक लढवत नाहीत, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, २०१९ मध्ये विद्यमान केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गांधीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यामुळे एक एक जागा महत्वाची असल्याने भाजप वरिष्ठ नेत्यांना मैदानात उतरविण्याची रणनीती आखात असली ते विजयी होतील याची भाजपला खात्री नाही. तसेच याचा प्रचार यंत्रणेवर देखील परिणाम होईल असं भाजपच्या एका गटाला वाटतंय.
राज्यसभेच्या दिग्गजांवरही लोकसभेची जवाबदारी देणार
आकडेवारीनुसार, राज्यसभेत भाजपचे १४ नेते असे आहेत ज्यांनी दोन टर्म पूर्ण केल्या आहेत किंवा पूर्ण करणार आहेत. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कर्नाटकचे राज्यसभेचे खासदार, महाराष्ट्रातील राज्यसभेचे खासदार पीयूष गोयल, राजस्थानचे राज्यसभेचे खासदार भूपेंद्र यादव यांचा समावेश आहे. या खासदारांनी राज्यसभेत दोन टर्म पूर्ण केल्या आहेत किंवा तिसरा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत.
याशिवाय पक्ष केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, मनसुख मांडविया, राजीव चंद्रशेखर यांनाही उमेदवारी देऊ शकतो. तसेच प्रकाश जावडेकर, भुवनेश्वर कलिता, सीएम रमेश, नीरज शेखर, भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह, अध्यक्ष नड्डा यांच्या नावांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
सीतारामन यांच्यासाठी ठराव मंजूर
भाजपच्या मदुराई शहरी जिल्ह्याने सीतारामन यांना निवडणूक लढविण्यास सांगणारा ठराव संमत केला आहे. तामिळनाडूतील मदुराई येथे अर्थमंत्र्यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे येथे भाजप ३९ पैकी २५ जागा जिंकण्याचा विचार करत आहे, मात्र राज्यात भाजपकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळीच नसल्याने हे सर्व केवळ कागदावर आहे. सध्या येथे पक्षाचा एकही खासदार नाही. 2019 मध्ये पुरी यांनी अमृतसरमधून ही निवडणूक लढवली होती, पण त्यांना काँग्रेसच्या गुरजित औजला यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
News Title : Lok Sabha Election 2024 BJP 160 Seats under danger zone check details on 13 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL