23 November 2024 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
x

अबब! विरोधक आणि जनतेच्या बँक अकाउंटवरील सर्व माहिती पारदर्शी हवी, पण भाजपला 5200 कोटी रुपये देणारा सिक्रेट 'एजन्ट 56' कोण?

Agent 56

Agent 56 | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांची ED मार्फत बँक अकाउंट अचानक सील केली जातात तर दुसरीकडे सामान्य लोंकांना त्यांच्या मिळकतीवर नजर ठेवण्यासाठी पॅन आधारकार्ड लिंक करण्याची सक्ती इन्कम टॅक्स विभागाकडून करण्यात आली. म्हणजे विरोधक असो किंवा सामान्य जनता, मोदी सरकार नेहमी पारदर्शी कारभाराच्या नावाखाली अनके नियम आणि कायदे लागू करत आहेत. पण, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पक्षाचे आहेत त्या भाजपाला कोणतेही नियम किंवा कायदे आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

काँग्रेसची पत्रकार परिषद

काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला जात आहे. यावेळी काँग्रेसने भाजपला इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून मिळालेल्या देणग्यांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते पवन खेरा यांनी पंतप्रधान मोदींची अप्रत्यक्षरीत्या तुलना जेम्स बाँडशी करत म्हटले की, जेम्स बाँडचा कोड 007 होता, पण आपल्या देशात असलेल्या एजंटचा कोड 56 आहे. जे स्वत:ला इलेक्टोरल बॉण्ड म्हणवून स्वत:ची ओळख करून देतात. याशिवाय काँग्रेसने पूरसदृश्य स्थितीवरून आम आदमी पक्ष आणि केंद्र सरकारला जोरदार घेराव घातला.

भाजपाला 5200 कोटी रुपये दिले कोणी?

काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, “जेम्स बाँड नावाची एक प्रसिद्ध मालिका आहे, ज्यात सुपर एजंट स्वतःची अशी ओळख करून देतो – माय नेम इज बॉन्ड 007… आपल्या देशाच्या राजकारणात एजंट ५६ आहे, नाव सांगण्याची गरज नाही. त्यांचा परिचय आहे – माय नेम इज बाँड, इलेक्टोरल बाँड… कारण या एजंटने २०१६-१७ आणि २१-२२ या आर्थिक वर्षात आपल्या भाजप पक्षासाठी ५२०० कोटी रुपये गोळा केले. हे पैसे कुठून आले याचा हिशेब नाही. ते कोणी दिले, का दिले? त्या बदल्यात तुम्ही त्यांना देशाची कोणती मालमत्ता विकली? याचा काहीहि हिशेब नाही.

याच पैशाने आमदार विकत खरेदी केले जातात – काँग्रेस

आमच्या एजंट 56 ला पारदर्शकता आवडत नाही असे नाही, ही पारदर्शकता फक्त आमच्यासाठी आहे, परंतु 5,200 कोटी रुपये इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून कसे आले हे आम्ही सांगणार नाही. अरुण जेटलींनी हे इलेक्टोरल बॉण्ड आणले होते, आम्हाला आक्षेप होते, पण ते मनी बिलासारखे मंजूर करून घेतले होते. पैशाच्या बिलाने आमदार विकत घेण्याचे, सरकार पाडण्याचे काम झाले.

काँग्रेस नेते पुढे म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कोणत्याही पक्षाकडे यायला हवा, हे फेअर अँड लव्हलीचे ज्वलंत उदाहरण आहे. ईडी-सीबीआय, इन्कम टॅक्सचे छापे नसतील, इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून परदेशातून एवढी मोठी रक्कम येत आहे, पण त्यांची चौकशी होणार नाही. ही माहिती सार्वजनिक करण्यास तुम्ही का घाबरत आहात?

News Title : Agent 56 5200 crore Rupees Connection with BJP Congress Press Conference check details on 14 July 2023

हॅशटॅग्स

#Agent 56(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x