23 November 2024 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Karur Vysya Bank Share Price | बँक FD तुम्हाला किती वार्षिक व्याज देतंय? करूर व्यास्या बँकेचा शेअर 1 वर्षाला 171% परतावा देतोय

Karur Vysya Bank Share Price

Karur Vysya Bank Share Price | करूर व्यास्या बँकेच्या शेअरमध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. गुंतवणूकदारांनी मोठा प्रमाणात हा बँकिंग स्टॉक खरेदी केला आहे. करूर व्यास्या बँकेच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

करूर व्यास्या बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचे एमडी आणि सीईओ यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला होता. याला RBI ने मंजुरी दिली आहे. आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी करूर व्यास्या बँकेचे शेअर्स 0.040 टक्के वाढीसह 126.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

स्टॉक वाढीचे कारण :

करूर व्यास्या बँकेच्या MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा कार्यकाळ वाढवल्याने बँकेच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. करूर व्यास्या बँके च्या संचालक मंडळाने बी रमेश बाबू यांना एमडी आणि सीईओ पदावर पुन्हा नियुक्त केले आहे. त्यांचा कार्यकाळ आणखी 3 वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. करूर व्यास्या बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला याबाबत महजी कळवली होती, आणि संबंधित प्रस्तावावर मंजुरी मागितली होती. याला RBI ने आता मान्य केले आहे. RBI चा हा निर्णय 29 जुलै 2023 पासून लागू होईल.

शेअरची कामगिरी :

करूर व्यास्या बँकेचे शेअर्स सोमवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह 130.95 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 2.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 171.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. करूर व्यास्या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 137.75 रुपये होती तर नीचांक पातळी किंमत 45.85 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Karur Vysya Bank Share Price today on 18 July 2023.

हॅशटॅग्स

Karur Vysya Bank Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x