6 January 2025 6:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअर तुफान तेजीत, कंपनी मोठी घोषणा करताच स्टॉक वेगात, डिटेल्स जाणून घ्या

Adani Green Share Price

Adani Green Share Price | अदानी ग्रुपची वार्षिक सर्वसाधारण बैठक नुकताच पार पडली. या बैठकीत अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी भाषणात माहिती दिली की, अदानी समूह गुजरातमधील खवडा येथे जगातील सर्वात मोठे हायब्रीड रिन्युएबल एनर्जी पार्क उभारणार आहे. ही बातमी जाहीर होताच कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 973.75 रुपये किमतीवर पोहचले होते.

23 ऑगस्ट 2022 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने 2574.05 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 28 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 439.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 976.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 993 रुपये किमतीवर पोहचला होता. नंतर स्टॉकमध्ये किंचित विक्री वाढली आणि स्टॉक 972 रुपये पर्यंत खाली आला होता. 24 मार्च 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स शेवटचे 1,030 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नंतर हा स्टॉक 1000 रुपये च्या खाली घसरला.

मागील एका वर्षात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 53.60 टक्के कमजोर झाली आहे. तर 2023 या वर्षात अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 49.93 टक्के कमजोर झाला आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.55 लाख कोटी रुपये आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स प्रमाण 53.4 अंकावर ट्रेड करत आहे. यावरून कळते की, हा स्टॉक जास्त खरेदी किंवा जास्त विक्री झाला नाही.

मागील एका वर्षात अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 1.2 च्या बीटासह अस्थिर व्यवहार दर्शवत आहे. अदानी ग्रीन कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, च्या सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहेत. गौतम अदानी यांनी एजीएम भाषणादरम्यान माहिती दिली की, अदानी ग्रीन एनर्जी कंपनी आता जगातील सर्वात मोठा हायब्रीड अक्षय ऊर्जा पार्क उभारणार आहे. हा पार्क गुजरात राज्यात खवड्यातील वाळवंटाच्या अगदी असणार आहे.

गौतम अदानी यांनी म्हंटले की, हा अदानी समूहाचा आजपर्यंतचा सर्वात जटिल आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे. हा प्रकल्प तब्बल 72,000 एकरमध्ये विस्तारलेला असेल. हा प्रकल्प 20 GW हरित निर्माण करण्यास सक्षम असेल. याशिवाय अदानी ग्रीन कंपनी राजस्थानमध्ये 2.14 GW क्षमतेचा जगातील सर्वात मोठा असा अवाढव्य संकरित सौर-पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price today on 19 July 2023.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x