23 November 2024 8:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Tomato Ginger Price Hike | मोदी है तो मुमकिन है! पावसाळ्यात गरमा-गरम अद्रक चहा विसरा, टोमॅटोनंतर अद्रक 300 रुपये किलो पार

Tomatoes Ginger Price Hike

Tomato Ginger Price Hike | आम्हाला सत्ता दिल्यास आम्ही महागाई कमी करू असं वचन देतं पंतप्रधान पदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने नवं-नवे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे देशातील सर्व जनता महागाईने त्रस्त झालेली असताना नरेंद्र मोदी मात्र हा विषयावर चकार शब्द काढत नाहीत. मागील १० वर्ष ते केवळ काँग्रेसवर टीका आणि धार्मिक मुद्दे पुढे करत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र तर चहा सुद्धा प्यावा की नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

महागाईचा विक्रम सुरूच
एकेकाळी भाजीसोबत कोथिंबीर मिरची मोफत मिळत होती. पण आज कोथिंबीर आणि मिरचीचे दरही विक्रम मोडत आहेत. मिरची १०० ते १२० रुपये किलो, सोयाबीन १६० रुपये किलो, आले ३०० रुपये किलो, लसूण २०० रुपये किलो दराने विकला जात आहे. कोथिंबीरही २०० रुपयांच्या पुढे गेली.

देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. सध्या टोमॅटोच्या दरावरून राजकीय संघर्ष सुरूच आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार महागाईला लगाम घालण्याचा प्रयत्न तरी करतंय का याचा देखील विचार पडू लागला आहे. आता तर आले, कोथिंबीर या भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. भाज्यांचे दर वाढण्यामागचे कारण म्हणजे अनेक राज्यांमध्ये झालेला मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे आले, लसूण, तुरी, कोथिंबीर या भाज्यांचे दरही वाढत आहेत. त्यात मोदी सरकारचे कोणतेही प्रयत्न सुरु आहेत हे त्यांच्या रोजच्या भाषणाच्या मुद्द्यातून तरी जाणवत नाही.

भाज्यांचे दर काय आहेत?
एकेकाळी भाजीसोबत कोथिंबीर मिरची मोफत मिळत होती. पण आज कोथिंबीर आणि मिरचीचे दरही विक्रम मोडत आहेत. मिरची १०० ते १२० रुपये किलो, सोयाबीन १६० रुपये किलो, लसूण २०० रुपये किलो, आले ३०० रुपये किलो, लसूण २०० रुपये किलो दराने विकला जात आहे. कोथिंबीरही २०० रुपयांच्या पुढे गेली. मात्र, अनेक ठिकाणी टोमॅटोच्या दरात किंचित घट झाली आहे. भाज्यांचे दर वाढल्याने त्याचा फटका ग्राहकांना तर बसत आहेच, शिवाय अनेक व्यापारीही खरेदी करत नाहीत. कारण दरवाढीमुळे भाजीविक्रेत्यालाही तोटा सहन करावा लागत आहे.

मुसळधार पावसामुळे भाज्यांचे दर वाढले
भाजीपाल्याबरोबरच फळांच्या दरातही वाढ होत आहे. सफरचंद पूर्वी १२०० ते १५०० रुपये प्रति बॉक्स दराने विकले जात होते. आता तो २२०० रुपये प्रति बॉक्स दराने विकला जात आहे. उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पावसामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे भाजीपाला पोहोचत नाही. त्यामुळे पुरवठा खर्च ात वाढ झाली आहे. आणि त्यांच्या किमती वाढत आहेत. हिमाचल प्रदेश, हरयाणा आणि राजस्थानमध्ये आलेल्या पुरामुळे भूस्खलनामुळे ही दरी अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे किरकोळ दरातही वाढ झाली आहे. भाजीपाल्याच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना अनेक शेतकरी केवळ भाजीपाला विकून कोट्यधीश झाले आहेत.

News Title : Tomato Ginger Price Hike in India check details on 20 July 2023.

हॅशटॅग्स

#Tomatoes Ginger Price Hike(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x