24 November 2024 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Bikaji Foods Share Price | बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीने भूजिया मार्केट काबीज केला, शेअर्स गुंतवणूकदारांना बंपर फायदा

Bikaji Foods Share price

Bikaji Foods Share Price | बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीने भुजियालालजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 49 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. ही गुंतवणूक सीसीडीच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. स्टॉक एक्सचेंज सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे की, भुजियालालजी प्रायव्हेट लिमिटेड ही एथनिक स्नॅक्स इंडस्ट्रीजमध्ये एक नावाजलेली उदयोन्मुख कंपनी म्हणून ओळखली जाते. (Bikaji Share Price)

बिकाजी फूड्स कंपनीने भुजियालालजी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक केल्याची बातमी जाहीर होताच, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 454.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 2.74 टक्के वाढीसह 460.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डील तपशील :

बिकाजी फूड्स इंटरनॅशनल आणि भुजियालालजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या डीलमध्ये एकूण 9,608 इक्विटी शेअर्स आणि 396 सीसीडीचा समावेश असेल. ज्याची किंमत 5100 रुपये प्रति सिक्युरिटी असणार आहे. याचे एकूण मूल्य 5.10 कोटी रुपये असून त्याचे दर्शनी मूल्य प्रति इक्विटी शेअर 10 रुपये निश्चित करण्यात आले आहे. भुजियालालजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्या क्षेत्रात नवीन आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये भुजिया आणि विविध प्रकारचे नमकीन सामील आहेत.

बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनूसार, कंपनीने भारतात प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. आणि कंपनी मोठ्या प्रमाणात उद्योग वाढीच्या योजनांची अमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातील भुजिया मार्केटमध्ये आपला जम बसवण्यासाठी बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीने भुजियालालजी प्रायव्हेट लिमिटेडमधील 49 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. कंपनीने माहिती दिली की, त्यांच्या व्यवसाय हा सातत्याने वाढत आहे. बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचे मुख्यालय राजस्थान राज्यात बिकानेर शहरात आहे. भारतील एकूण संघटित स्नॅक व्यवसाय मार्केट 4,240 अब्ज एवढा मोठा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bikaji Foods Share price today on 20 July 2023.

हॅशटॅग्स

Bikaji Foods Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x