Reliance Industries Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये बंपर तेजी, आजच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक लिस्ट होणार
Reliance Industries Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 20 जुलै 2023 रोजी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमधून वित्तीय व्यवसाय शाखा विलग होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स आज गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजीच्या विशेष कंपनीचे डिमर्जर करणार आहे. याचे प्रमाण 1 : 1 निश्चित करण्यात आले आहे. (Jio Financial Share Price)
रिलायन्स कंपनीची वित्तीय शाखा असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा व्यवसाय विलग करण्यासाठी 20 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित करण्यात आला होता. आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के वाढीसह 2,614.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपली वित्तीय शाखा व्यवसाय रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंटमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला होता. आणि या डिमर्ज्ड युनिटचे नाव Jio Financial Services असे जाहीर करण्यात आले होते. Jio Financial कंपनीच्या शेअरची लिस्टिंग तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्याचबरोबर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक शेअर बाजारात विविध निर्देशांकांमध्ये आणि NSE इंडेक्समध्ये सूचीबद्ध केला जाणार आहे.
हे विलगिकरण पूर्ण झाल्यास जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी वित्तीय सेवा क्षेत्रातील भारतातील पाचवी सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारूपाला येईल. विलगीकरण व्यवस्थे अंतर्गत रिलायन्स कंपनीच्या शेअर धारकांना जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे एक शेअर्स देण्यात येणार आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा एक शेअर्स, त्यांना जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा एक शेअर दिला जाणार आहे.
रिलायन्स कंपनीने आपल्या विलगिकरण योजनेत पात्र शेअर धारकांना जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स वाटप करण्यासाठी 20 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला होता. जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे 20 जुलै 2023 रोजी रिलायन्स कंपनीचे शेअर्स असले तर तो गुंतवणुकदार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा शेअर मिळण्यास पात्र असेल. 19 जुलै 2023 हा दिवस X- रेकॉर्ड डेट होता.
20 जुलै 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सची किंमत निश्चित करण्यासाठी एक विशेष प्रीओपन सेशन आयोजित करेल. निफ्टी व्यतिरिक्त जिओ फायनान्शियल स्टॉक निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 500 सारख्या इतर निर्देशांकांमध्ये देखील सूचीबद्ध केला जाईल. या इव्हेंट अंतर्गत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक निफ्टी इंडेक्समधील 51 वा स्टॉक बनला आहे.
Jio Financial कंपनीला आपल्या औपचारिक लिस्टिंगच्या तिसऱ्या दिवशी निफ्टीमधून वगळले जाईल. विलिनीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने शेअर्स बाजारात सूचीबद्ध केले जातील. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मात्र Jio Financial स्टॉकची किंमत 160 ते 200 रुपये दरम्यान असण्याची शक्यता आहे. अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सची किंमत 160 रुपये असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. तर ब्रोकरेज फर्म नुवामाने शेअरची किंमत 168 रुपये असण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Reliance Industries Share Price today on 20 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News