22 November 2024 3:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Rain Alert | महाराष्ट्रासह 9 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या शहर-गावात पाऊस कसा असेल

Rain Alert

Rain Alert | महाराष्ट्र उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा आणि ओडिशासह विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी येथे मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली होती. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेवरही परिणाम झाला. आयएमडीने उपनगर आणि रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

रत्नागिरीला मोठा तडाखा

रत्नागिरी जिल्ह्यास पावसाचा चांगला तडाखा बसला आहे. चिपळूण आणि खेडमध्ये 48 तासांत तब्बल 327 मिलीमाटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी कायम आहे. उतर रत्नागिरीत भागात पावसाचा तडाखा जास्त आहे. पालघर जिल्ह्यास रेड अलर्ट दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. 19 जुलै पर्यंत राज्यात केवळ ५८ टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील धरणसाठा आता ३७ टक्क्यांवर गेला आहे.

महाराष्ट्रात कुठे कोणता अलर्ट

* रेड अलर्ट :
पुणे , पालघर , ठाणे ,रायगड , अतिमुसळधार पावसाचा अलर्ट

* आँरेज अलर्ट :
मुंबई , रत्नागिरी

* यलो अलर्ट :
सिंधुदुर्ग , सातारा , नाशिक , नंदुरबार , कोल्हापूर ,भंडारा , अकोला , अमरावती , बुलढाणा , चंद्रपूर , गडचिरोली

मॉन्सूनचे ताजे अपडेट्स:

* ठाणे, रायगड, पुणे आणि पालघर मध्ये 21 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
* हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात आणि पुढील तीन दिवसांत गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
* आयएमडीने उत्तराखंडसाठी २२ जुलै रोजी यलो अलर्ट आणि २१ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
* उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर आणि पिथौरागड जिल्ह्यात २० जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
* उधमसिंह नगर आणि हरिद्वार वगळता उत्तराखंडच्या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
* हिमाचल प्रदेशात २२ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
* आयएमडीने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 22 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
* मध्य प्रदेशात 22 जुलै आणि छत्तीसगडमध्ये 18 ते 22 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

News Title : Rain Alert weather report 21 July updates alert of heavy rains in 9 states check details on 21 July 2023.

हॅशटॅग्स

#Rain Alert(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x