24 November 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या
x

Kaka Industries Share Price | काका इंडस्ट्रीज शेअरने फक्त 1 दिवसात 100% परतावा दिला, आता रोज अप्पर सर्किट तोडतोय, खरेदी करणार?

Kaka Industries Share Price

Kaka Industries Share Price | काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. लिस्टिंग झाल्यापासुन या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 100 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. तर स्टॉक 5 टक्के वाढीसह 115 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. (Kaka Share Price)

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 121.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. IPO किंमतीच्या तुलनेत काका इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 127.56 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ज्या लोकांनी काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 2.45 लाख रुपये झाले आहे. काका इंडस्ट्रीज कंपनीचा IPO 10 जुलै ते 12 जुलै 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत बँड 55 ते 58 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर करण्यात आली होती. या SME IPO स्टॉकचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. कंपनीने आपल्या IPO मध्ये 10 रुपये दर्शनी किमतीचे 3,660,000 इक्विटी शेअर्सचे इश्यू केले होते.

काका इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या आयपीओमध्ये एका लॉट अंतर्गत 2,000 शेअर्स जारी केले होते. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड फर्म काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO चे रजिस्ट्रार म्हणून काम करत होते. काका इंडस्ट्रीज कंपनीचे प्रवर्तक राजेश धीरूभाई गोंडालिया, भाविन राजेशभाई गोंडालिया आणि राजेशकुमार धीरूभाई गोंडालिया हे आहेत. स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले.

एका लॉटसाठी गुंतवणूकदारांना 1.16 लाख रुपये जमा करावे लागले होते. आणि IPO 100 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता. अशा परिस्थितीत IPO मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 1.16 लाख रुपये जमा केले होते, त्यांना लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी 2.32 लाख रुपये नफा मिळाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kaka Industries Share Price today on 21 July 2023.

हॅशटॅग्स

Kaka Industries Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x