24 November 2024 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची
x

Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, शेअर ट्रेडिंग पुन्हा सुरू होणार? सविस्तर माहिती जाणून घ्या

Reliance Capital Share Price

Reliance Capital Share Price | अनिल अंबानीची लिलाव झालेली दिवाळखोर कंपनी रिलायन्स कॅपिटल आपल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीमध्ये 200 कोटी रुपये भांडवल गुंतवणुक करणार आहे. यासह RGICL कंपनी अतिरिक्त 400 कोटी रुपये भांडवल उभारणीचा देखील विचार करत आहे. डिसेंबर 2022 च्या सुरुवातीला RGICL कंपनीने रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या प्रशासकाकडे पत्राद्वारे 600 कोटी रुपये भांडवली मदत मागितली होती.

RGICL कंपनीने व्यवसाय टिकवण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी, आणि कंपनीचे सॉलव्हेंसी गुणोत्तर 155 टक्क्यांवरून वाढवून 175 टक्क्यांवर नेण्यासाठी जास्तीचे भांडवल आवश्यक असल्याची विनंती केली होती. जर ही भांडवली गुंतवणुक झाली तर IRDA मध्ये RGICL कंपनीची नियामक सोई देखील वाढेल. सध्या दिवाळखोरी प्रक्रिया सुरू असल्याने रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग बंद करण्यात आली आहे.

रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्सने कंपनीला RGICL मध्ये 200 कोटी रुपये भांडवली गुंतवणुक करण्याची परवानगी दिली आहे. रिलायन्स कॅपिटल कंपनी ही गुंतवणूक ऑगस्ट 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याची शक्यता आहे. रिलायन्स कॅपिटल कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जाते असून त्यासाठी सर्वात मोठी बोली हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्सने जाहीर केली आहे.

रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या करदात्यांना या रकमेतून इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स कंपनी 10,000 कोटी रुपये अदा करेल. यात 9,661 कोटी रुपये आगाऊ रक्कम अदा केली जाईल. यासोबतच IIHL कंपनीने देखील RGICL कंपनीमध्ये 350 कोटी रुपये भांडवल गुंतवणूकीची ऑफर दिली आहे.

आरजीआयसीएल या नॉन-लाइफ इन्शुरन्स कंपनीमध्ये सध्या 7,000 पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग काम करत असून कंपनीकडे 70 लाख पेक्षा जास्त ग्राहक वर्ग आहे. सध्या रिलायन्स कॅपिटल कंपनीचे व्यवहार बंद करण्यात आले आहे. रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरमध्ये कोणत्याही प्रकारची खरेदी विक्री होत नाहीये. मात्र शेअरची किंमत BSE इंडेक्सवर 5 टक्के वाढीसह 11.33 रुपये किमतीवर दिसत आहे. 2008 साली रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 2765 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Capital Share Price today on 21 July 2023.

हॅशटॅग्स

#Reliance Capital Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x