24 November 2024 5:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Utkarsh Small Finance Bank IPO | बाब्बो! बँक FD नव्हे, या बँकेच्या शेअरने फक्त एक दिवसात 92% परतावा दिला, शेअर खरेदीला आजही स्वस्त

Utkarsh Small Finance Bank IPO

Utkarsh Small Finance Bank IPO | आज शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. निर्धारित वेळेच्या दोन दिवस आधीच शेअरची लिस्टिंग करण्यात आली आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 15 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. (Utkarsh Bank Share Price)

शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 37.20 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. तर काही वेळातच शेअरची किंमत 48 रुपये किमतीवर पोहोचली होती. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना 92 टक्केचा जोरदार नफा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 21जुलै 2023 रोजी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 92 टक्के वाढीसह 48 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना शेअर्स 25 रुपये प्राइस बँडवर वाटप करण्यात आले. या स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 15 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. अशा स्थितीत उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 37.20 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले. आणि अवघ्या काही मिनिटातच शेअर 48 रुपये किमतीवर पोहचला.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 23-25 रुपये निश्चित करण्यात आली होती. किरकोळ गुंतवणूकदाराना किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉटमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा देण्यात आली होती. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या एका IPO लॉटमध्ये 600 शेअर्स ठेवले होते.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा IPO तब्बल 110 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा IPO मधील किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 78.38 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 88.74 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO चा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 135.71 पट खरेदी करण्यात आला होता. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 18.02 पट अधिक खरेदी करण्यात आला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Utkarsh Small Finance Bank IPO stock on 21 July 2023.

हॅशटॅग्स

#Utkarsh Small Finance Bank IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x