23 November 2024 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Infosys Share Price | इन्फोसिस शेअर्स दणक्यात आपटले, शेअरची किंमत 7 टक्क्याने स्वस्त झाली, अफाट घसरणीचे कारण काय?

Infosys Share Price

Infosys Share Price | नुकताच इन्फोसिस कंपनीने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. तिमाहीच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिस स्टॉक अक्षरशः आपटला. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Infosys ADR स्टॉक न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर 13.5 टक्क्यांच्या घसरणीसह 15.33 डॉलर्स या इंट्राडे नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीपासून 4 टक्के वर ट्रेड करत आहे.

इन्फोसिस ADR कंपनीचे शेअर्स खालच्या किंमत पातळीवरून सावरले आणि 16.22 डॉलर्स प्रति शेअर किमतीवर क्लोज झाले होते. बुधवारच्या 17.71 डॉलर्स या क्लोजींग किमतीच्या तुलनेत इन्फोसिस स्टॉक गुरुवारी 8.41 टक्क्यांच्या घसरणीसह क्लोज झाला होता. BSE इंडेक्सवर शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 7.73 टक्के घसरणीसह 1,337.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

भारतीय शेअर बाजारात ओपनिंगच्या काही सेकंदात स्टॉक 10 टक्के आपटला. इन्फोसिस स्टॉक 1,320.20 रुपये किमतीवर ओपन झाला आणि 1,305 रुपये या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहचला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस स्टॉक तब्बल 105.80 रुपये खाली आला होता. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती हे इन्फोसिस कंपनीच्या शेअर होल्डर्सच्या आणि संचालकांच्या यादीत सामील आहेत. त्यांना देखील स्टॉक घसरणीचा जबरदस्त फटका बसला आहे. ब्रिटनच्या फर्स्ट लेडी अक्षता मूर्ती सूनक या इन्फोसिसच्या प्रवर्तक आणि सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत.

जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीमधील शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार अक्षता मूर्ती यांनी इन्फोसिस कंपनीचे 3,89,57,096 शेअर्स धारण केले आहेत. कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या तुलनेत त्यांच्या शेअरचे प्रमाण 1.07 टक्के आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पहिल्या तासात इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 105.80 रुपये घसरले होते. अक्षता मूर्ती सुनक यांच्याकडे 3,89,57,096 शेअर्स असून स्टॉक घसरणीमुळे त्यांना एका दिवसात 412 कोटी तोटा सहन करावा लागला आहे.

इन्फोसिस कंपनीच्या एप्रिल ते जून 2023 या तिमाहीमधील शेअर होल्डिंग पॅटर्न अद्याप जाहीर झालेले नाही. इन्फोसिस ही भारतातील TCS नंतर दुसरी सर्वात मोठी IT सेवा कंपनी आहे. इन्फोसिस कंपनीने गुरुवार दिनांक 20 जुलै रोजी आर्थिक वर्ष 2023-2024 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

कंपनीच्या निव्वळ नफ्यात 11 टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनीने 5,945 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत कंपनीने 5,360 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील दहा महिन्यात इन्फोसिस कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 13.60 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price today on 22 July 2023.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x