19 April 2025 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Heavy Rain Alert | मुसळधार पावसाचा इशारा! कामानिमित्त बाहेर जाणार आहात? मुंबई-पुण्यासह 9 जिल्ह्यांना अलर्ट, तुमचा जिल्हा कोणता?

Heavy Rain Alert

Heavy Rain Alert | कोकणासह राज्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईसह 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काम असेल, तरच घराबाहेर पडा.

राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस बसतोय. अनेक ठिकाणी तर पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आजपासून पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर भुसावळमध्ये मागचे काही दिवस पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय. त्यामुळे हातनुर धरणाचे सलग दुसऱ्या दिवशीही 41 दरवाजे पूर्णपणे उघडे आहेत.

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. राज्याच्या काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुर्घटनाही घडल्या आहेत. पुढील काही दिवस राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबई-पुण्यासह 9 जिल्ह्यांना अलर्ट

23 जुलै रोजी कोकणासह काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला असून, यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, यलो अलर्ट दिला गेला आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Mumbai Rains)

कोकण, सातारा, कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम राहणार

24, 25 आणि 26 जुलै पर्यंतचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. यात कोकणात मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचा इशारा दिला गेला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार आहे. या जिल्ह्यांना तीनही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

News Title : Heavy Rain Alert IMD Report check details on 23 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Heavy Rain Alert(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या