22 November 2024 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ICICI Bank Share Price | आयसीआयसीआय बँके शेअर्समध्ये तुफानी खरेदी, नेमकं कारण काय? शेअर खरेदी करावा?

ICICI Bank Share Price

ICICI Bank Share Price | आयसीआयसीआय बँक या खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आपल्या जून 2023 या तिमाही काळात आयसीआयसीआय बँकेने 40 टक्क्यांच्या वाढीसह 9,648 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. बँकेच्या बुडीत कर्जात घट झाल्याने आणि व्याज उत्पन्नात सुधारणा झाल्याने निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे. (ICICI Share Price)

मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत आयसीआयसीआय बँकेने 6,905 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 999.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बँकेची आर्थिक कामगिरी :

आयसीआयसीआय बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न मागील वर्षीचा तिमाहीच्या तुलनेत 38 टक्क्यांच्या वाढीसह 18,227 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत आयसीआयसीआय बँकेने 13,210 कोटी रुपये निव्वळ व्याज उत्पन्न कमावले होते. मागील वर्षीच्या जून तिमाहीत आयसीआयसीआय बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन 4.01 टक्के नोंदवले गेले होते, जे आता 4.7 टक्के झाले आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारली असून एकूण NPA वार्षिक आधारावर 3.4 टक्क्यांवरून कमी होऊन 2.7 टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे आयसीआयसीआय बँकेचे निव्वळ एनपीए 0.7 टक्क्यांवरून घसरून 0.4 टक्के पर्यंत खाली आले आहे. या बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण जून 2022 अखेर 18.04 टक्के होते, जे कमी होऊन या तिमाहीत 16.71 टक्क्यांवर आले आहे.

आयसीआयसीआय बँकेने सेवक दिलेल्या माहिती कळवले आहे की, 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न 28,337 कोटींवरून वाढून 38,763 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. जून 2023 तिमाहीत आयसीआयसीआय बँकेचे व्याज उत्पन्न देखील 23,672 कोटी रुपयेवरून वाढून 33,328 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील आठवड्याच्या शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 1001.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,008.70 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 780.10 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ICICI Bank Share Price today on 24 July 2023.

हॅशटॅग्स

#ICICI Bank Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x