18 November 2024 11:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News
x

Oriental Rail Infra Share Price | अबब! तब्बल 31100% परतावा देणारा ओरिएंटल रेल इन्फ्रा शेअर सतत अप्पर सर्किट लागतोय, खरेदी करावा?

Oriental Rail Infra Share Price

Oriental Rail Infra Share Price | ओरिएंटल रेल इन्फ्रा ही ट्रेनचे सीट्स बनवणारी भारतातील दिग्गज कंपनी मानली जाते. मागील आठवड्यात बुधवारी या कंपनीने जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. आर्थिक निकाल जाहीर केल्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 65.52 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Oriental Rail Share Price)

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 353.17 कोटी रुपये आहे. ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनी मागील 19 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 3 डिसेंबर 2004 रोजी 21 पैशांवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 68 रुपयेच्या पार गेला आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 68.79 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 19 वर्षात ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 31100 टक्के नफा कमावून दिला आहे. अवघ्या 33,000 रुपये गुंतवणूक केलेल्या लोकांना ओरिएंटल रेल इन्फ्रा स्टॉकने करोड़पती बनवले आहे. मात्र मागील एका वर्षापासून या स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 132 रुपये याआपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 4 मे 2023 रोजी पर्यंत ओरिएंटल रेल इन्फ्रा स्टॉक तब्बल 75 टक्क्यांच्या घसरणीसह 33.50 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर आला होता. त्यानंतर पुन्हा शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी वाढली आणि शेअरची किंमत 96 टक्क्यांनी वाढली.

आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. जून 2023 तिमाहीमध्ये ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीने अप्रतिम कामगिरी केली आहे. एप्रिल-जून 2023 या तिमाहीत कंपनीने 46 टक्क्यांच्या वाढीसह 5.44 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मार्च 2023 तिमाहीत ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीला 8 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. कंपनीचा परिचालन महसूल जून 2023 तिमाहीत 92.81 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर मार्च 2023 तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात किंचित घसरण झाली आहे.

मार्च 2023 तिमाहीत ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीने 120.37 कोटी रुपये परिचलन महसूल संकलित केला होता. याशिवाय ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीने आपली ओरिएंटल फाउंड्री या उपकंपनीकडे 1,429.81 कोटी रुपये मूल्याचे वर्क ऑर्डर्स असल्याची माहिती दिली होती. 19 जुलै 2023 रोजी ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते.

20 आणि 21 जुलै 2023 रोजी तसेच आज 24 जुलै 2023 रोजी देखील ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमधे अडकले होते. ओरिएंटल रेल इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः रेल्वे सीट, शटरिंग प्लेट, लॅव्हेटरी डोअर, आर्टिफिशियल लेदर, रेसिन बनवण्याचे काम करते. या कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये BHEL आणि CONCOR सारख्या दिग्गज कंपन्या देखील सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Oriental Rail Infra Share Price today on 24 July 2023.

हॅशटॅग्स

Oriental Rail Infra Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x