
Future Retail Share Price | फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या रडारवर आले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये 3.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. मागील काही दिवसांपासून फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार उलाढाल पाहायला मिळाली आहे.
मागील एका महिन्यात हा स्टॉक 21.67 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या स्टॉकमध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीच्या लिलावाला सुरुवात होणार आहे. फ्युचर रिटेल ही कंपनी कर्जबाजारी झाली असून दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स 3.95 टक्के घसरणीसह 3.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2017 मध्ये फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स 645 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा शेअर 99 टक्के घसरणीसह 3.65 रुपये किमतीवर आला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणने फ्यूचर रिटेल लिमिटेड विरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत 17 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढवली आहे.
सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे की NCLT च्या मुंबई खंडपीठाने फ्युचर रिटेल कंपनीला 33 दिवसांसाठी दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेतून वगळण्याची परवानगी दिली आहे. फ्युचर रिटेल कंपनीने माहीती दिली की, “NCLT ने 17 जुलै 2023 रोजी फ्युचर रिटेल कंपनीची विनंती एकूण दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 33 दिवसांची मुदत दिली आहे. यापूर्वी, NCLT खंडपीठाने CIRP पूर्ण करण्यासाठी फ्युचर रिटेल कंपनीला 15 जुलै 2023 पर्यंत म्हणजेच 90 दिवसांची मुदत दिली होती.
दिवाळखोरी संहिता (IBC) अंतर्गत, CIRP प्रकिया 330 दिवसांच्या आगा पूर्ण करणे बंधनकारक असते. फ्युचर रिटेल कंपनी विरुद्ध 20 जुलै 2022 रोजी कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया NCLT ने सुरू केली होती. दिवाळखोरी संहितेच्या कलम 12(1) नुसार, CIRP प्रक्रिया सुरू झाल्यापासून 180 दिवसांच्या कालावधीत कंपनीच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असते. CIRP म्हणजेच दिवाळखोरी प्रक्रिया कायदेशीरपणे 330 दिवसांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























