18 November 2024 9:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Kaka Industries Share Price | काका इंडस्ट्रीज शेअरमध्ये तुफान तेजी कायम, अल्पावधीत गुंतवणूकदारांना 144 टक्के परतावा

Kaka Industries Share Price

Kaka Industries Share Price | नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या काका इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये अजूनही तेजी कायम आहे. मागील आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काका इंडस्ट्रीज कंपनीचे IPO शेअर्स 100 टक्के प्रीमियम वाढीसह 115 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. यानंतर, गुरुवार आणि शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.

चालू आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 133.93 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.40 टक्के वाढीसह 144 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत.

IPO तपशील :

काका इंडस्ट्रीज कंपनीचा IPO स्टॉक 10 जुलै ते 12 जुलै 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 55 रुपये ते 58 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर केली होती. या SME कंपनीच्या IPO मध्ये 10 रुपये दर्शनी मूल्याचे 3,660,000 फ्रेश इक्विटी शेअर्स इश्यू करण्यात आले होते. तर काका इंडस्ट्रीज कंपनीच्या आयपीओमध्ये एका लॉट अंतर्गत 2,000 शेअर्स जारी करण्यात आले होते. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड फर्मला काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO चे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

काका इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तक गटात राजेश धीरूभाई गोंडालिया, भाविन राजेशभाई गोंडालिया, राजेशकुमार धीरूभाई गोंडालिया आहेत. या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांना किमान 1.16 लाख रुपये जमा करावे लागले होते. तर हा IPO 100 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाला होता. स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले होते. आता मागील काही दिवसात हा स्टॉक चार दिवसात हा शेअर 144 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kaka Industries Share Price today on 26 July 2023.

हॅशटॅग्स

Kaka Industries Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x