22 April 2025 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | 433 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK
x

Olectra Share Price | मालामाल शेअर! मल्टिबॅगर आलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर एका दिवसात 10 टक्के परतावा देतोय, नेमकं कारण काय?

Olectra Share Price

Olectra Share Price | आलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. आज शेअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 27 टक्के वाढली आहे. मात्र मागील पाच दिवसात हा स्टॉक 10 टक्के घसरला होता, त्यांची वसुली आज कंपनीने एका दिवसात केली आहे. (Olectra Greentech Share Price)

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.78 टक्क्यांच्या घसरणीसह 1188.75 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.00 टक्के वाढीसह 1,190.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीने मागील काही महिन्यात जबरदस्त कामगिरी करून आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील आठवड्यात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये घसरण पहायला मिळाली होती, कारण चीनची कंपनी BYD’s ही EV वाहन निर्माता कंपनी भारतात मोठी गुंतवणुक करून उत्पादन प्रकल्प उभारू इच्छित आहे. हा प्लांट पूर्वी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात येणार होता. मात्र भारत सरकारने सोमवारी BYD या चिनी कंपनीचा प्रस्ताव नामंजूर केला. आणि ही बातमी आल्यानंतर आलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली.

सध्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेककडे 1000 कोटीपेक्षा जास्त मूल्याचे काम आहे. आलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीला 550 शुद्ध इलेक्ट्रिक बस तयार करण्याची ऑर्डर मिळाली होती. मागील सहा महिन्यांत आलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 156.21 टक्के नफा कमावून दिला आहे.

पुढील काळात आलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनी तेलंगणा राज्यात 150 एकर जमिनीवर ईव्ही ग्रीनफिल्ड मॅन्युफॅक्चरिंग सेंटर उभारणार आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,465.00 रुपये होती. तर नीचांक पातळी 374.10 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Olectra Share Price today on 26 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Olectra Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या