24 April 2025 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेंदाता कंपनी शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, जोरदार खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी स्टॉक पुन्हा तेजीत; 5 वर्षात 2,028% परतावा दिला, टार्गेट अपडेट जाणून घ्या - NSE: TTML Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, सुस्तावलेला स्टॉक पैसा वसूल करणार - NSE: TATATECH Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम
x

Asarfi Hospital Share Price | लॉटरी लागली! असर्फी हॉस्पिटल शेअरने फक्त 1 दिवसात 100 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदी करणार का?

Asarfi Hospital Share Price

Asarfi Hospital Share Price | असर्फी हॉस्पिटल कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त वाढीसह सूचीबद्ध झाले आहेत. असर्फी हॉस्पिटल कंपनीचे शेअर्स बुधवारी दिनांक 26 जुलै 2023 रोजी 100 टक्के प्रीमियम वाढीसह BSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचे शेअर्स तब्बल 100 टक्के प्रीमियम वाढीसह 98.80 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाले आहे. (Asarfi Share Price)

आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. शेअरची लिस्टिंग काही वेळात किंमत 103.74 रुपये या उच्चाक किमतीवर पोहचली होती. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी असर्फी हॉस्पिटल कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 104 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

असर्फी हॉस्पिटल कंपनीच्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 52 रुपये निश्चित करण्यात आली होती. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दुप्पट परतावा मिळाला आहे. 17 जुलै 2023 रोजी असर्फी हॉस्पिटल कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

बुधवार दिनांक 19 जुलै 2023 पर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होता. असर्फी हॉस्पिटल कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 51 रुपये ते 52 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर केली होती. असर्फी हॉस्पिटल IPO मध्ये 26.94 कोटी रुपये मूल्याचे 51.80 लाख इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकले आहेत.

हेम सिक्युरिटीज लिमिटेड यांना असर्फी हॉस्पिटल कंपनीच्या पब्लिक इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तर कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस यांना IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. किरकोळ गुंतवणूकदारांना IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 104,000 रुपये जमा करावे लागले होते. तर एका लॉटमध्ये कंपनीने 2,000 शेअर्स ठेवले होते.

असर्फी हॉस्पिटल ही कंपनीची उपस्थिती झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ही कंपनी आपल्या IPO मधून जमा केलेले पैसे झारखंडच्या रंगुनी येथील कॅन्सर हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी खर्च करणार आहे. तसेच सामान्य व्यावसायिक वापरासाठी कंपनी झारखंडची राजधानी रांची येथे भाडेतत्त्वावर जमीन संपादित करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Asarfi Hospital Share Price today on 27 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Asarfi Hospital Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या