18 November 2024 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

SJVN Share Price | प्रतिदिन दणादण परतावा देतोय एसजेवीएनशेअर, या बातमीने अजून तुफान तेजी येणार, डिटेल्स जाणून घ्या

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेवीएन लिमिटेड कंपनीने नुकताच आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, एसजेवीएन लिमिटेड कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी एसजेवीएन ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कडून 1200 MW क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प बांधकामासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे.

एसजेवीएन ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी RFS तरतुदींनुसार भारतात योग्य त्याठिकाणी 1000 MW क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प आणि पंजाब राज्यात 200 MW चे क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प BOO तत्त्वावर विकसित केले जाणार आहे. या 1200 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम आणि विकास मूल्य 7,000 कोटी रुपये असणार आहे. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.36 टक्के घसरणीसह 56.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील आठवड्यात एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 50.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर काल बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 21 जुलै 2023 रोजी एसजेवीएन लिमिटेड कंपनीने माहिती दिली की, एसजेवीएन लिमिटेड कंपनीने आपल्या सहाय्यक कंपन्या आणि संयुक्त उपक्रमांच्या सर्व प्रलंबित प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी REC लिमिटेड कंपनीसोबत 50 हजार कोटी रुपयेचा सामंजस्य करार केला आहे. याशिवाय एसजेवीएन लिमिटेड कंपनीने आपल्या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या 300 मेगावॅट क्षमतेच्या अक्षय ऊर्जेसाठी वीज खरेदी करार केला आहे.

24 जुलै 2023 रोजी एसजेवीएन लिमिटेड कंपनीन मुंबईमध्ये 200 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड कंपनीसोबत करार केला आहे. यासोबत दिल्लीमध्ये 100 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीसोबत देखील व्यापारी करार केला आहे.

महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात येणाऱ्या 200 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सोलर प्रकल्पाचा विकास खर्च 1,200 कोटी रुपये असेल. तर एसजेवीएन ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने महावितरणद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ई-रिव्हर्स लिलावात भाग घेतला होता. आणि त्यांनी हा लिलाव प्रति युनिट 2.90 रुपये दराची बोली लावून जिंकली आहे.

एसजेवीएन लिमिटेड ही कंपनी मुख्यतः वीज निर्मितीचा व्यवसाय करते. एसजेवीएन लिमिटेड कंपनी जलविद्युत प्रकल्पांचे बांधकाम करण्यासाठी देखील सल्ला देण्याचे काम करते. मागील तीन वर्षात एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price today on 27 July 2023.

हॅशटॅग्स

SJVN Share price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x