Ion Exchange Share Price | एक नंबर! आयओएन एक्सचेंज इंडिया शेअरने 6 महिन्यात पैसे दुप्पट केले, शेअरची कामगिरी जाणून घ्या
Ion Exchange Share Price | आयओएन एक्सचेंज इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आल्या गुंतवणूकदारांना अफाट नफा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत आयओएन एक्सचेंज इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 730 टक्के नफा कमावून दिला आहे. (Ion Share Price)
24 जुलै 2020 रोजी आयओएन एक्सचेंज इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 65.97 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 24 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 549.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.18 टक्के वाढीसह 531.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ज्या लोकांनी तीन वर्षांपूर्वी आयओएन एक्सचेंज इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 8.33 लाख रुपये झाले आहे. या कंपनीचे शेअर्स गुरुवारी 603 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आणि इंट्राडे ट्रेडमध्ये स्टॉक 11 टक्के घसरणीसह 535.80 रुपये किमतीवर आला होता.
29 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 150.07 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 25 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 609.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आयओएन एक्सचेंज इंडिया लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 8060 कोटी रुपये आहे.
आयओएन एक्सचेंज इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 67 अंकावर आहे. यावरून कळते की, स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये. या शेअरचा वार्षिक बीटा 0.9 असून तो कमी अस्थिरतेचे निर्देशक आहे. आयओएन एक्सचेंज इंडिया लिमिटेड स्टॉक 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे. मात्र हा स्टॉक 5 दिवसांच्या सरासरी किमतीच्या खाली ट्रेड करत आहे.
जून 2023 च्या तिमाहीत आयओएन एक्सचेंज इंडिया लिमिटेड कंपनीने 18.73 टक्क्यांच्या वाढीसह 33.27 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. 2022-23 आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून तिमाहीत या कंपनीने 28.02 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफा 81.68 कोटी रुपयेवर पोहचला होता. जून 2023 तिमाहीत कंपनीने 22.81 टक्के वाढीसह 487.88 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 397.28 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2023 तिमाहीत आयओएन एक्सचेंज इंडिया लिमिटेड कंपनीने 652.97 कोटी रुपये सेल्स नोंदवला होता. 26 जुलै 2023 रोजी आयओएन एक्सचेंज इंडिया लिमिटेड कंपनीने तिमाही निकालासह कंपनीच्या सदस्यांच्या मान्यतेच्या अधीन राहून कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून अतिरिक्त संचालक म्हणून संजय जोशी यांना 5 वर्षांची मुदत वाढ दिली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Ion Exchange Share Price today on 28 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल