23 November 2024 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Ashirwad Capital Share Price | होय! फक्त 4 रुपयाच्या पेनी शेअरचा आशीर्वाद, रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, कंपनी सुद्धा मजबूत नफ्यात

Ashirwad Capital Share Price

Ashirwad Capital Share Price | आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये 4.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. आशीर्वाद कॅपिटल कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी जून 2023 चे तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळत आहे. (Ashirwad Share Price)

आशीर्वाद कॅपिटल कंपनीने 30 जून 2023 रोजी संपलेल्या जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात तब्बल 140 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आशीर्वाद कॅपिटल या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 24.18 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 4.23 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जून 2023 तिमाहीचे निकाल :

जून तिमाहीत आशीर्वाद कॅपिटल कंपनीने ऑपरेशनल महसूलमध्ये 128.71 टक्के वाढ नोंदवली आहे. Q1FY23 मध्ये कंपनीच्या महसुलात 0.10 कोटी रुपयेवरून वाढ झाली असून, कंपनीने 0.23 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. कंपनीचा ऑपरेटिंग नफा 118.63 टक्क्यांच्या वाढीसह 0.10 कोटी रुपयेवरून वाढून 0.22 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. यासह कंपनीचा निव्वळ नफा 140 टक्क्यांच्या वाढीसह 0.09 कोटी रुपयेवरून वाढून Q1FY24 मध्ये 0.20 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जून 2023 मध्ये आशीर्वाद कॅपिटल कंपनीने 128.21 टक्के वाढीसह 0.23 कोटी रुपये निव्वळ सेल्स केली आहे.

मागील वर्षी जून 2022 मध्ये आशीर्वाद कॅपिटल कंपनीने 0.10 कोटी रुपये निव्वळ सेल्स नोंदवला होता. नुकताच हा कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. याप्रमाणे कंपनीने एक्सरेकॉर्ड तारीख बुधवार दिनांक 19 जून 2023 रोजी शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप केले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.22 रुपये प्रति शेअर होती. 52 आठवड्यांछ नीचांक पातळी किंमत 2.49 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashirwad Capital Share Price today on 28 July 2023.

हॅशटॅग्स

Ashirwad Capital Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x