14 December 2024 6:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Godfrey Philips Share Price | सिगरेट फुकून पैशाचा धूर सोडण्यापेक्षा या सिगरेट कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, पैशाने श्रीमंत व्हाल

Godfrey Philips Share Price

Godfrey Philips Share Price | गॉडफ्रे फिलिप्स या सिगारेट निर्माता कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15.4 टक्के वाढीसह 1,990 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर स्टॉकमध्ये ही उसळी पाहायला मिळाली आहे. (Godfrey Share Price)

गॉडफ्रे फिलिप्स कंपनीने जून 2023 ला संपलेल्या पहिल्या तिमाहीत 220.97 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीच्या जून तिमाहीच्या नफ्यात मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत 68.6 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी गॉडफ्रे फिलिप्स कंपनीचे शेअर्स 8.88 टक्के वाढीसह 2,077.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील आर्थिक वर्षाच्या जून 2022 तिमाहीत गॉडफ्रे फिलिप्स कंपनीने 131.05 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीच्या महसुलात देखील 26.84 टक्के पाहायला मिळाली होती. जून तिमाहीत गॉडफ्रे फिलिप्स कंपनीचा महसूल 26.84 टक्के वाढीसह 1,245.39 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाही कालावधीत गॉडफ्रे फिलिप्स कंपनीने 981.83 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

दरम्यान आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 1,036.06 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 25.5 टक्के अधिक आहे. जून 2023 तिमाहीत या कंपनीने 1,298.08 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जो मागील 2022-23 या वर्षीच्या तुलनेत 31.9 टक्के अधिक आहे.

एप्रिल-जून 2023 या तिमाही कालावधीत सिगारेट, तंबाखू आणि संबंधित उत्पादनांमधून गॉडफ्रे फिलिप्स कंपनीने 1,128.90 कोटी रुपये कमाई केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत ही कमाई 28.7 टक्के अधिक आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 104.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

या तिमाहीत कंपनीच्या एकूण महसुलात 8.08 टक्के वाढ झाली असून, कंपनीने 112.95 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. गॉडफ्रे फिलिप्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 74 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 130.03 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Godfrey Philips Share Price today on 28 July 2023.

हॅशटॅग्स

Godfrey Philips Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x