24 November 2024 2:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Refex Industries Share Price | ना पोस्ट ऑफिस ना बँक! रेफेक्स इंडस्ट्रीज शेअरने 5 वर्षात 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 60 लाख रुपये परतावा

Refex Industries Share Price

Refex Industries Share Price | सध्या जर तुम्ही भरघोस परतावा देणाऱ्या स्टॉक गुंतवणुकीसाठी शोधत असाल तर तुम्ही रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात. या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. 25 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये 731 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1615.03 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 805.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Refex Share Price)

शेअरची कामगिरी :

रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 47.58 टक्के नफा कमावून दिला आहे. मगील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 227.61 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 575.14 टक्के वाढली आहे.

मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1413 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 5,910 टक्के नफा कमावून दिला आहे. जुलै 2018 मध्ये रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 805 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 5 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 60 लाख रुपये झाले आहे.

कंपनी बद्दल थोडक्यात :

रेफेक्स इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील एक विशेषज्ञ उत्पादक आणि रेफ्रिजरंट गॅसेसची रिफिलर कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी हायड्रोफ्लोरोकार्बन्स नावाचे नॉन-ओझोन प्रमाण कमी करणारे रेफ्रिजरंट वायू पुरवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स आणि रेफ्रिजरेटिंग उपकरणांमध्ये वापरले जाणारे शीतवायू बनवण्याचे काम करते. यासह कंपनी डिस्पोजेबल कॅनमध्ये ऑटोमोटिव्ह एअर कंडिशनिंग वायूंच्या पुरवठ्याचे काम देखील करते. कंपनीच्या व्यावसायिक उत्पादनात रेफ्रिजरंट वायू, कोळसा, फ्लाय अॅश हाताळणी, पॉवर ट्रेडिंग, सौर ऊर्जा उपकरणे देखील सामील आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Refex Industries Share Price today on 28 July 2023.

हॅशटॅग्स

Refex Industries Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x