23 November 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Oriana Power IPO | आला रे आला IPO आला! ओरियाना पॉवर IPO मध्ये गुंतवणूक करणार? शेअरवर आत्ताच 85 टक्के फायदा दिसतोय

Oriana Power IPO

Oriana Power IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुश खबर आहे. लवकरच ओरियाना पॉवर कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ओरियाना पॉवर ही कंपनी मुखतः सोलर एनर्जी निर्मितीचा व्यवसाय करते. ओरियाना पॉवर कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार आहे. (Oriana Power Share Price)

ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या IPO शेअरला गुंतवणूकदारांनी चांगली पसंती दर्शवली आहे. ओरियाना पॉवर कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 85 टक्के प्रीमियम किमतीवर खरेदी-विक्री केले जात आहेत. यावरून ओरियाना पॉवर कंपनीचे शेअर्स शानदार लिस्टिंग नोंदवू शकतात, अशी शक्यता आहे.

ओरियाना पॉवर कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 100 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. ओरियाना पॉवर कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 115-118 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्रे मार्केट किमतीनुसार ओरियाना पॉवर स्टॉक 100 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक आपल्या IPO किंमत बँडच्या तुलनेत 85 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. जर हा IPO स्टॉक 118 रुपये अप्पर प्राइस बँडवर इश्यू करण्यात आला, आणि ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत 100 रुपयेवर टिकुन राहिली, तर स्टॉक लिस्टिंगमध्ये शेअर 218 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

ओरियाना पॉवर कंपनीचे शेअर्स 11 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. ओरियाना पॉवर कंपनीचा IPO मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीच्या आयपीओची अंतिम दिवस ३ ऑगस्ट 2023 असेल. ओरियाना पॉवर कंपनीच्या IPO शेअरचे वाटप 8 ऑगस्ट 2023 रोजी सुरू केले जातील.

या कंपनीचे शेअर्स 11 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये किमान 1 लॉटसाठी अर्ज करून गुंतवणूक करू शकतात. कंपनीने 1 लॉटमध्ये 1200 शेअर्स ठेवले आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 141600 रुपये जमा करावे लागतील. ओरियाना पॉवर कंपनी 59.66 कोटी रुपये भांडवल उभारणीसाठी IPO लाँच करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Oriana Power IPO today on 29 July 2023

हॅशटॅग्स

Oriana Power IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x