25 November 2024 1:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य
x

Hawkins Cooker Share Price | हॉकिन्स की सिटी बजी! कुकर कंपनीच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 3.30 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स

Hawkins Cooker Share Price

Hawkins Cooker Share Price | शेअर बाजारात जे लोक दीर्घकाळ गुंतवणूक करतात, अशा गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळतो. हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. 20 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स फक्त 19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 6677 रुपये किमतीवर पोहचला आहे.

या कंपनीच्या शेअरने अवघ्या 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. यासह हॉकिन्स कुकर्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना डिव्हिडंड वाटप करून भरघोस फायदा पोहोचवला आहे. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.072 टाके घसरणीसह 6,670.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

गुंतवणुकीवर 33687 टक्के परतावा :

हॉकिंग कुकर लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 33687 टक्के नफा कमावून दिला आहे. 20 वर्षांपूर्वी जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.37 कोटी रुपये झाले असते. हॉकिन्स कुकर लिमिटेड ही कंपनी मुख्यतः स्वयंपाकघरातील भांडी बनवण्याचे काम करते. हॉकिंग किचन या ब्रँड अंतर्गत कंपनीचा व्यवसाय आणि बाजार हिस्सा खूप मोठा आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19.56 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 144.76 टक्के नफा कमावून दिला आहे.

इतर फायदे :

हॉकिन्स कुकर कंपनीने आपल्या शेअर धारकांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सवर 100 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. हॉकिन्स कुकर कंपनीने 24 मे 2023 रोजी आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 9 ऑगस्ट 2023 रोजी हॉकिन्स कुकर कंपनी आपल्या एजीएममध्ये मंजुरी मिळाल्यानंतर लाभांश वाटप करायला सुरुवात करेल.

मार्च 2023 च्या तिमाहीमध्ये हॉकिन्स कुकर कंपनीने 21.37 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आता जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 22.8 कोटी रुपयेवर पोहचला आहे. मार्च तिमाहीत या कंपनीने 271.83 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर जून तिमाहीत कंपनीने 253.85 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hawkins Cooker Share Price today on 29 July 2023.

हॅशटॅग्स

Hawkins Cooker Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x