13 December 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

ठाकरे-शरद पवारांशिवाय 'शिंदे-अजित पवार गटाची' राजकीय लायकी किती? या मोठ्या सर्व्हेने भाजप-शिंदे-अजित पवार गटाची झोप उडणार

Maharashtra Lok Sabha Election Survey

India TV-CNX | महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या प्रवेशामुळे आधीच भाजपचं राजकीय टेन्शन वाढलं आहे. एकाबाजूला शिंदे गटाच्या भाजपसोबत येण्याने अनेक सर्व्हेत भाजपला काहीच फायदा होताना दिसत नसताना उलट नुकसान होतं असल्याचं समोर आलं होतं. पण अजित पवारांना सोबत आणून देखील भाजपाची राजकीय चिंता अजून वाढणार असल्याचं सध्याचा एक प्रसिद्ध सर्व्हेत समोर आलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदार हा ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेससोबत असल्याचं पाहायला मिळतंय.

इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल अत्यंत धक्कादायक आहेत. ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसू शकतो. महाराष्ट्र विधानसभेच्या ४८ जागांपैकी भाजपला केवळ २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे भाजपचे मित्रपक्ष एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाला केवळ २-२ जागा मिळू शकतात. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेसला या सर्वेक्षणात मोठा फायदा होऊ शकतो. शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ११ आणि काँग्रेसला ९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

इंडिया टीव्ही-सीएनएक्सने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एक ओपिनियन पोल जारी केला आहे. त्यात भाजप, शिवसेना आणि काँग्रेसव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या जागांचाही उल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अजित पवार गटाला फक्त दोन जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्राची मतांची टक्केवारी

* भाजप – 32%
* कांग्रेस – 16%
* शिवसेना (शिंदे गट) – 07%
* शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 16%
* राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 05%
* राष्ट्रवादी (शरद पवार) – 13%
* इतर – 11%

महाराष्ट्रात लोकसभेत कोणाला जागा मिळण्याचा अंदाज?

* भाजप – 20
* काँग्रेस – 9
* शिवसेना (शिंदे गट) – 2
* शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 11
* राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 2
* राष्ट्रवादी (शरद पवार) – ४ जागा

News Title : Maharashtra Lok Sabha Election Survey India TV CNX check details on 30 July 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x