23 November 2024 2:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024
x

RVNL Share Price | RVNL शेअर्स ऑफर फॉर सेलला जोरदार प्रतिसाद, शेअरमध्ये आजही जबरदस्त खरेदी सुरू, डिटेल्स पाहा

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी मालकीच्या रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. कंपनीने नुकताच आपला ऑफर फॉर सेल जाहीर केला होता. आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदारांकडून या ऑफर फॉर सेलला अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. दोन दिवस सुरू असलेली ही ऑफर फॉर सेल शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंद झाली आहे. (Rail Vikas Nigam Share Price)

या ऑफर फॉर सेल अंतर्गत भारत सरकारने RVNL कंपनीचे 11.17 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकले आहेत. याचे एकूण भाग भांडवलाशी प्रमाण 5.36 टक्के आहे. आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 2.65 टक्के वाढीसह 124.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ऑफर फॉर सेल स्कीम :

भारत सरकारने RVNL कंपनीच्या ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअरची किंमत 119 रुपये निश्चित केली होती. या ऑफर फॉर सेलला चांगला प्रतिसाद मिळाला तर सरकार अतिरिक्त 4.08 कोटी शेअर्स म्हणजेच आणखी 1.96 टक्के भांडवल खुल्या बाजारात विकणार आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सरकारने मोठ्या प्रमाणात शेअर विक्रीचा केल्याने स्टॉक लाल निशाणीवर ट्रेड करत होता. एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 12 टक्क्यांनी घसरली आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शुक्रवारी RVNL स्टॉक 4.12 टक्के घसरणीसह 120.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

सरकारचे स्पष्टीकरण :

भारत सरकारचे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागचे सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार, RVNL कंपनीच्या ऑफर फॉर सेलला गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. RVNL ही रेल्वे कंपनी आता भारत सरकारची किमान सार्वजनिक शेअर होल्डिंग असलेली कंपनी बनली आहे. या ऑफर फॉर सेलमध्ये RVNL कंपनीमधील भारत सरकारचा भाग भांडवल वाटा 78.20 टक्क्यांवरून कमी होऊन 72.84 टक्क्यांवर आला आहे.

RVNL कंपनीची स्थापना जानेवारी 2003 मध्ये भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या पूर्ण मालकीची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून करण्यात आली होती. या कंपनीच्या माध्यमातून भारतीय रेल्वेचा पायाभूत सुविधा विकास प्रकल्प राबवला जातो, आणि त्यासाठी निधी उभारण्याचे काम केले जाते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| RVNL Share Price today on 31 July 2023

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x