23 November 2024 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Oriana Power IPO | अबब! पहिल्याच दिवशी 90 टक्के परतावा मिळणार? IPO आज गुंतवणुकीसाठी खुला झाला, पहा GMP किती आहे

Oriana Power IPO

Oriana Power IPO | मागील काही महिन्यापासून शेअर बाजारात एकामागून एक IPO लाँच होण्याचा धडाका सुरू झाला आहे. गुंतवणुकदार IPO मध्ये गुंतवणूक कडून अल्पावधीत आपले पैसे अनेक पट वाढवत आहेत. या आठवड्यात देखील आणखी एक IPO बाजारात दाखल होतोय. ओरियाना पॉवर ही SME कंपनी आपला IPO गुंतवणुकीसाठी शेअर बाजारात लाँच करणार आहे. (Oriana Power Share Price)

ओरियाना पॉवर IPO डिटेल :

ओरियाना पॉवर कंपनीचा IPO मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी पासून गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ओरियाना पॉवर कंपनीने आपल्या IPO साठी प्रति इक्विटी शेअर 115 रुपये ते 118 रुपये किंमत बँड जाहीर केली आहे. ही ऊर्जा कंपनी आपल्या IPO द्वारे 60 कोटी रुपये भांडवल उभारण्याची तयारी करत आहे. या कंपनीच्या IPO ची अंतिम मुदत गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी संपणार आहे.

ओरियाना पॉवर GMP :

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते ग्रे मार्केटमध्ये ओरियाना पॉवर कंपनीचे शेअर्स 100 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा शेअर 218 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. याचा अर्थ IPO मधे गुंतवणूक करणाऱ्या लोकांना पहिल्याच दिवशी 90 टक्के नफा मिळू शकतो. ओरियाना पॉवर कंपनीने एका लॉटमध्ये 1200 शेअर्स ठेवले आहेत.

कंपनीबद्दल थोडक्यात :

ओरियाना पॉवर ही कंपनी मुख्यतः औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना सौर ऊर्जा उपाय प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी ऑन-साइट सौर प्रकल्प म्हणजेच, रूफटॉप आणि ग्राउंड-माउंट सिस्टम, ऑफ-साइट सोलर फार्म्सच्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा उपाय प्रदान करते. मार्च 2023 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात ओरियाना पॉवर, कंपनीने 133.9 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि कंपनीने याच तिमाहीत 12.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Oriana Power IPO is open for investment on 01 August 2023.

हॅशटॅग्स

Oriana Power IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x