12 December 2024 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

NINtec Systems Share Price | लय भारी शेअर! मागील 1 वर्षात NINtec सिस्टम शेअरने 1300% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स

NINtec Systems Share Price

NINtec Systems Share Price | एनआयएनटेक सिस्टम या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. एनआयएनटेक सिस्टम कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 4 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. एनआयएनटेक सिस्टम या कंपनीने शेअर धारकांना प्रत्येक 5 शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत जारी केले.

या कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट म्हणून गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 हा दिवस निश्चित केला होता. बोनस शेअर्स मुळे कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 389 रूपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 408.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात एनआयएनटेक सिस्टम कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 1300 टक्के पेक्षा अधिक वाढली आहे. मागील एका वर्षात एनआयएनटेक सिस्टम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1328 टक्के परतावा कमावून दिला आहे.

21 जून 2022 रोजी एनआयएनटेक सिस्टम कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 45.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 389 रुपये होती. एनआयएनटेक सिस्टम कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 51.85 रुपये होती.

मागील 6 महिन्यांत एनआयएनटेक सिस्टम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63.79 टक्के परतावा मिळवून दिला आहे. YTD आधारे एनआयएनटेक सिस्टम कंपनीच्या शेअरची किंमत 61 टक्के पेक्षा अधिक वाढली आहे. एनआयएनटेक सिस्टम ही एक टेक्नॉलॉजी कंपनी म्हणून काम करते. ही कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि सोल्यूशन्स स्पेशलायझेशनमध्ये तज्ञ मानली जाते. कालच्या बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड तारीखमुळे आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी एनआयएनटेक सिस्टम कंपनीच्या शेअरमध्ये प्राईस ॲडजस्टमेंट पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NINtec Systems Share Price today on 04 August 2023.

हॅशटॅग्स

NINtec Systems Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x