23 November 2024 8:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Penny Stocks | होय! पेनी शेअर फक्त 40 पैशांचा, मागील 5 दिवसात गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा दिला, चिल्लर आहे का खिशात?

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात असे काही पेनी स्टॉक आहेत, जे गुंतवणूकदारांना अल्पावधीत करोडपती बनवू शकतात. आणि रातोरात त्यांना दिवाळखोर देखील बनवू शकतात. असाच एक पेनी स्टॉक होता, ज्याने आपल्या गुंतवणुकीचे 1 लाख रुपयेचे 3170 रुपये केले होते. आता मात्र हा स्टॉक पुन्हा एका तेजीत आला आहे. (Sanwaria Consumer Share Price)

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमधे सनवारिया कंझ्युमर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 12.50 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. गुरुवारच्या पूर्वी 5 ट्रेडिंग सेशनमध्ये सनवारिया कंझ्युमर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 50 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी सनवारिया कंझ्युमर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.11 टक्के घसरणीसह 0.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सनवारिया कंझ्युमर लिमिटेड कंपनी काय करते?

सनवारिया कंझ्युमर लिमिटेड कंपनीची स्थापना 1991 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः कृषी प्रक्रिया क्षेत्रात व्यवसाय करते. या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 33.12 कोटी रुपये आहे. ही कंपनी शुद्ध तेल आणि सोया पेंडच्या व्यवसायात देखील गुंतलेली आहे. 31 जुलै 2023 पासून या कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा हालचाल पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या पूर्वी अवघ्या पाच दिवसांत या कंपनीचे शेअर्स 30 पैशांवरून वाढून 45 पैशांवर पोहोचले होते. मात्र शुक्रवारी स्टॉक मध्ये जोरदार प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली.

सनवारिया कंझ्युमर स्टॉक परतावा

मागील एका वर्षात सनवारिया कंझ्युमर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 50.00 टक्के घसरण झाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1.05 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 25 पैसे होती. सनवारिया कंझ्युमर लिमिटेड कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 15.35 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. या कंपनीमध्ये परकीय गुंतवणूकदारांचा किंवा देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांचा भाग भांडवल वाटा शून्य आहे. उर्वरित भाभांडवल किरकोळ गुंतवणूकदारांनी होल्ड केले आहे.

25 सप्टेंबर 2017 पासून सनवारिया कंझ्युमर लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना कोणताही लाभांश वाटप केलेला नाही. 2017 मध्ये या कंपनीने आपल्या शेअर धारकांना दोनदा 5-5 टक्के लाभांश वाटप केला होता. तर 2010 मध्ये कंपनीने शेअर धारकांना 20 टक्के, 2009 मध्ये 15 टक्के लाभांश, 2009 मध्ये 10 टक्के लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks of Sanwariya Consumer Share Price on 05 August 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(542)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x