22 April 2025 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL
x

हरियाणा नूंह मध्ये जमिनीचा ताबा आणि बिल्डर्ससाठी हिंदू-मुस्लिम दंगली घडवल्या? 2.5 एकर जमीन बुलडोझरराजने ताब्यात घेतली

Haryana Nuh violence

Haryana Nuh Violence | हरियाणातील नूंह मधील हिंसाचारानंतर हळूहळू शांतता परत येत आहे. दरम्यान, सरकार बुलडोझर मूडमध्ये दिसत आहे. शुक्रवारी प्रशासनाने १५० झोपडपट्ट्या आणि पाच बेकायदा घरांवर बुलडोझर डागला होता. शनिवारी पुन्हा एकदा पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. एसएचकेएम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली. येथील बेकायदा बांधकाम पाडण्यात आले आहे. प्रशासनाने अडीच एकर जागा रिकामी केली आहे.

मुख्यमंत्री खट्टर यांच्या सूचनेनुसार कारवाई

नूंह जिल्ह्यातील एसकेएम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळील बेकायदा बांधकाम हरियाणा प्रशासनाने शनिवारी पाडले. यानंतर नूंहचे एसडीएम अश्विनी कुमार म्हणाले, “मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या सूचनेनुसार हे करण्यात आले आहे. अडीच एकरात हे अतिक्रमण पसरले होते. हे सर्व बेकायदा बांधकाम होते. नुकत्याच झालेल्या हिंसक झटापटीत यातील काही जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जमिनीचा ताबा घेण्यास सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार, सत्ताधाऱ्यांचे हितसंबधं असलेल्या मेडिकल कॉलेजजवळील बेकायदा दुकानांवर भाजप प्रशासनाचा बुलडोझर धावला आहे. याशिवाय बेकायदा कब्जाही हटविण्यात आला आहे. शनिवारी सकाळी प्रशासनाचे पथक नल्हार मंदिराजवळ असलेल्या मेडिकल कॉलेजजवळ पोहोचले आणि तेथे असलेली बेकायदा अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू केले. हिंसाचारानंतर सरकारच्या बुलडोझर कारवाईमुळे बेकायदा बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच या दंगली जमिनी ताब्यात घेण्यासाठीच नियोजनबद्ध घडवल्या गेल्या अशी शंका निर्माण झाली आहे. कारण याच परिसरात प्रचंड प्रमाणात टॉवर्स आणि कॉर्पोरेट पार्क उभे राहिले असून, अनेक टोलेजंग इमारती नोएडा ते दिल्ली पर्यंत पसरल्या आहेत.

सरकारी जागेवर बांधलेल्या घरांवर आणि झोपडपट्ट्यांवर बुलडोझर

यापूर्वी नूह मधील तावडू येथील सरकारी जागेवर अतिक्रमण केलेल्या सुमारे २५० झोपडपट्ट्या व इतर अतिक्रमणे बुलडोझरने पाडण्यात आली होती. विशेष म्हणजे विहिंपच्या जलाभिषेक यात्रेवर ज्या मार्गावर हल्ला झाला होता, त्याच मार्गावर ही घरे होती. मुस्लिमबहुल जिल्ह्यात सोमवारी जातीय दंगल उसळल्यानंतर तीन-चार दिवसांनी प्रशासनाने ही कारवाई केली. नूंहचे उपायुक्त प्रशांत पंवार यांनी मात्र या कारवाईचा हिंसाचाराशी काहीही संबंध नसल्याचा इन्कार केला आहे. पण नंतर चंदीगडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विज म्हणाले, ‘बुलडोझर ही देखील कारवाईतील एक कृती आहे. त्यामुळे आता एकच चर्चा सुरु झाली आहे. कारण याच भागातून नोएडा ते दिल्ली मार्गावर भले मोठे टॉवर आणि कॉर्पोरेट पार्क उभारले गेले आहेत. लवकरच विधानसभा आणि लोकसभा होणार असल्याने बिलर्स आणि सरकारच्या संगनमतातून हे घडवलं गेलंय का याची जोरदार चर्चा हरयाणात सुरु झाली आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Haryana Nuh violence bulldozer action on illegal construction encroachment Khattar Govt 05 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Haryana Nuh violence(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या