14 December 2024 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा दर धडाम, 10 ग्रॅम सोनं 2400 रुपयांनी स्वस्त झालं, आठवड्यात मोठी संधी, नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | या आठवड्यात सराफा बाजारात सोन्याची चमक विशेष नव्हती, तर चांदीच्या दरात घसरण झाली. मात्र सलग पाच दिवसात सोने २७३ रुपये प्रति १० ग्रॅमने घसरले आहे, तर चांदीच्या दरात १८६० रुपयांची घसरण झाली. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 59294 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर, चांदीचा भाव 72000 रुपये प्रति किलो राहिला. आयबीजेएकडून ही माहिती घेण्यात आली आहे. (Gold Rate Today)

31 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 59505 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आणि 59567 रुपयांवर बंद झाला. त्याचप्रमाणे चांदी 73561 रुपये प्रति किलोवर उघडली आणि 73860 रुपयांवर बंद झाली.

या आठवड्यात चांदीचा भाव 74428 वर पोहोचला आणि 72000 पर्यंत घसरला. 1 ऑगस्ट रोजी चांदी 74428 रुपयांवर उघडली होती. दुसरीकडे या काळात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 273 रुपयांची घसरण झाली आहे. 31 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 59567 रुपयांवर बंद झाला होता, तर 4 ऑगस्टला तो 59294 रुपयांवर बंद झाला होता.

सोन्याची शुद्धता – 31 जुलैचा भाव 4 ऑगस्ट घटलेला दर

Gold 999 (24 कॅरेट) – 59294 – 59567 -273
Gold 995 (23 कॅरेट) – 59057 – 59328 -271
Gold 916 (22 कॅरेट) – 54313 – 54563 -250
Gold 750 (18 कॅरेट) – 44471 – 44675 -204
Gold 585 (14 कॅरेट) – 34687 – 34847 -160

आज रविवारी सोने किती रुपयांनी स्वस्त झालंय?

आता सोने ऑल टाइम हाय दरांपासून तब्ब्ल 2445 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झालं आहे. 5 मे रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा स्पॉट भाव 61739 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. तर या दिवशी चांदीचा भाव 77280 रुपये प्रति किलो होता. आजच्या दरापेक्षा चांदी सुमारे 5280 रुपये प्रति किलोने स्वस्त होत आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 06 August 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x