22 November 2024 7:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा लढवण्याची शक्यता

Shivsena, Udhav Thackeray, Aaditya Thackeray, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : शिवसेना नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता शिवसेनेतच जोर धरू लागली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नेमके कोणत्या मतदारसंघातून लढावे याची पूर्ण चाचपणी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिवसेनेने केल्याची खात्रीलायक माहिती प्रसार माध्यमांकडे आहे. युवा सेनेचे सरचिटणीस व आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून या विषयाची माहिती सार्वजनिक केली. संबंधित पोस्टमध्ये लिहिले की, ‘हीच वेळ आहे हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय!’ त्यामुळे ठाकरे कुटुंबात आदित्य यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे म्हटले जाते.

सूत्रांनी सांगितले की, शिवसेनेच्या एका अंतर्गत सर्व्हेमध्ये आदित्य ठाकरे यांनी कुठून लढावे यासंदर्भात एक सर्वेक्षण करून घेतले आहे. त्यात ४ मतदारसंघांचा पर्याय समोर आला. त्यानुसार वांद्रे पूर्व, माहिम, शिवडी आणि वरळी हे ते ४ मतदारसंघ आहेत. चारही मतदारसंघांमध्ये अनुक्रमे तृप्ती सावंत, सदा सरवणकर, अजय चौधरी आणि सुनील शिंदे हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यात शिवडी येथून मनसेचे बाळा नांदगावकर विधानसभा लढवत असल्याने शिवसेना कोणताही धोका पत्करणार नाही, तसेच माहीम विधानसभेची जागा आज जरी शिवसेनेकडे असली तरी त्याचं मूळ कारण २०१४ मधील मोदी लाट हेच होतं ज्याचा थेट फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला झालं होता. तसेच येथून मनसेचे नितीन सरदेसाई विधानसभा लढवत असल्याने शिवसेना येथून देखील धोका पत्करणार नाही.

त्यात वांद्रे पूर्व येथून अल्पसंख्यांकाची मतं मोठ्या प्रमाणावर असल्याने काय होईल सांगता येणार नसल्याने शिवसेना येथून देखील धोका पत्करणार नाही. त्यामुळे पहिली पसंती ही वरळीला असेल. वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. कारण विधानसभेचे माजी अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांनी १९९० ते २००४ पर्यंत चार वेळा या ठिकाणी विजय मिळविला होता. २००९ मध्ये राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांनी विजय मिळवून शिवसेनेला धक्का दिला होता; पण २०१४ मध्ये मोदी लाटेत शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी या ठिकाणी मोठा विजय मिळवून बालेकिल्ला पुन्हा मिळवला आणि त्याच मूळ कारण होतं ते शिवसेना एनडीए’चा घटक पक्ष होता आणि युती न होता देखील त्यांना मोदी लाटेचा फायदा झाला होता. दरम्यान, शिवडी आणि माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेची मोठी ताकद असल्याने या मतदासंघात शिवसेना कमीत कमी आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत कोणताही धोका पत्करेल असं वाटत नाही.

उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि चाळीतील रहिवासी असे मिश्रण असलेल्या वरळी मतदारसंघाला आदित्य पसंती देऊ शकतात, असे शिवसेनेतील नेत्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या दमदार यशामुळे युतीत उत्साहाचे आणि आत्मविश्वासाचे वातावरण असून चार महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याची खात्री युतीला वाटत आहे. तसे झाले तर आदित्य यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते मिळू शकेल. मुख्यमंत्रीपद भाजपला आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला असे ठरले तर उपमुख्यमंत्रीपदही त्यांना मिळू शकेल. ठाकरे घराण्यात आजवर कोणीही लोकसभा, विधानसभा व इतर निवडणूक लढलेली नाही. आदित्य हे मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे निर्वाचित अध्यक्ष आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x