Navin Fluorine Share Price | मार्ग श्रीमंतीचा! नवीन फ्लोरिन शेअरने अवघ्या 76000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, डिटेल्स पहा
Navin Fluorine Share Price | नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल या फ्लोरो केमिकल्स उत्पादन करणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. जून 2023 तिमाहीतील निराशाजनक कामगिरीमुळे गुंतवणूकदारांनी स्टॉक विक्रीला सुरुवात केली आहे. मागील 10 वर्षांत नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
जून तिमाहीमध्ये निराशाजनक कामगिरी करून देखील काही दिग्गज ब्रोकरेज फर्मने नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 2.33 टक्के घसरणीसह 4,401.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
जून 2023 तिमाहीमध्ये नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल कंपनीच्या महसूल संकलनात मागील वर्षाच्या तुलनेत 9 टक्क्यांची घट झाली आहे. जून तिमाहीत कंपनीने 350.71 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल कंपनीच्या निव्वळ नफ्यात 20 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे आणि कंपनीने फक्त 63.01 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह 4494.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
8 ऑगस्ट 2013 रोजी नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 33.88 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 4 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4494.10 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ज्या लोकांनी 2013 साली नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरमध्ये 76 हजार रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत.
27 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3766.45 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 15 मे 2023 रोजी म्हणजेच अवघ्या चार महिन्यांत हा स्टॉक 31 टक्क्यांच्या वाढीसह 4922 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.
ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, दीर्घ काळात नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरने मजबूत कामगिरी केली आहे. उच्च मार्जिन मूल्यावर लक्ष ठेवून नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल कंपनी आपल्या व्यवसायात वाढ करत आहे. कंपनी आपली क्षमता देखील वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने आपल्या R & D पायाभूत सुविधा देखील मजबूत बनवण्याची योजना आखली आहे.
यामुळे अनेक ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल कंपनीने जून 2023 तिमाहीमध्ये निराशाजनक कामगिरी केली असून देखील स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल स्टॉकवर 5368 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Navin Fluorine Share Price today on 7 August 2023
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News