23 November 2024 6:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Paytm Share Price | पेटीएम करो! पेटीएम शेअर्स खरेदी आणि टार्गेट प्राईस वाढली, स्वस्त झालेला शेअर तेजीच्या दिशेने, लवकरच नशीब बदलेल

Paytm Share Price

Paytm Share Price | पेटीएमची मूळ कंपनी One97 Communications चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी कंपनीचे 10.30 टक्के शेअर्स पुन्हा खरेदी करण्यासाठी Ant Financial कंपनीसह करार केला आहे. या डील नंतर अँट फायनान्शियल कंपनी पेटीएममधील सर्वात मोठी गुंतवणुकदार राहणार नाही. विजय शेखर शर्मा हे पेटीएम कंपनीचे संस्थापक तसेच सीईओ आहेत. अँट फायनान्शियल ऑफ नेदरलँड्स होल्डिंग फर्म आपल्या संपूर्ण मालकीच्या रेझिलिएंट अॅसेट मॅनेजमेंट BV द्वारे या व्यवहारात सामील होणार आहे.

तथापि या करारानंतर विजय शेखर शर्मा यांच्या भाग भांडवलाचे प्रमाण वाढून 19.42 टक्के होईल. आणि Ant Financial फर्मचे शेअर होल्डिंग प्रमाण कमी होऊन 13.5 टक्केवर येईल. आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 2.33 टक्के घसरणीसह 830.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विजय शेखर शर्मा यांनी दिलेल्या माहितनुसार, पेटीएम कंपनीचे हे शेअर्स संपादन करण्यासाठी कोणतीही रोख पेमेंट केली जाणार नाही. आणि विजय शेखर शर्मा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही तारण, हमी किंवा इतर प्रक्रियाद्वारे हे शेअर्स अधिग्रहण करणार नाही. या व्यवहारामुळे पेटीएम कंपनीच्या व्यवस्थापन मंडळ नियंत्रणात देखील कोणताही फेरफार केला जाणार नाही. विजय शेखर शर्मा म्हणाले की मी ANT ग्रुपचे त्यांच्या भागीदारी कराराबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो.

विविध बातम्यांच्या पार्श्वभूमीवर चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेटीएम कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम स्टॉक 11 टक्के वाढीसह 874 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होता. त्या आधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 795.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

पेटीएम कंपनीचा आयपीओ 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. पेटीएम कंपनीच्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 2150 रुपये निश्चित करण्यात आली होती. ही किंमत पेटीएम स्टॉक आजपर्यंत स्पर्श करू शकला नाही. आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणुकदार अद्याप नुकसानीत अडकले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price today on 08 August 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x