15 December 2024 1:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Viral Video | समोर अनेक पुरुष-महिला कार्यकर्ता, 'आय लव्ह यू टू' म्हणत मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचा फ्लाइंग किस, नेटिझन्सचा भाजपवर हल्लाबोल

Viral Video

Viral Video | संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावरील दुसऱ्या दिवसाच्या चर्चेला बुधवारी राहुल गांधी यांच्या भाषणाने सुरुवात झाली. राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आणि सत्ताधारी पक्षाला देशद्रोही ठरवले. मणिपूरमधील महिलांवरील घृणास्पद अत्याचारावरून राहुल गांधी मोदी सरकारवर तुटून पडले.

‘तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही, खुनी आहात. पंतप्रधानांवरही त्यांनी निशाणा साधला. राहुल गांधीयांच्या या वक्तव्यावरून गदारोळ माजला होता. सभापतींच्या आदेशानुसार रात्री उशिरा त्यांचे निवेदन सभागृहाच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आले. मात्र दुसऱ्या बाजूला समाज माध्यमांवर राहुल गांधी प्रचंड समर्थन मिळत आहे.

याशिवाय राहुल गांधी यांच्यावर संसदेत अशोभनीय वर्तन (फ्लाईंग किस) केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभागृहात ‘फ्लाइंग किस’ दाखवून महिला खासदारांबाबत अश्लिल वर्तन केल्याचा आरोप महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी केला. विशेष म्हणजे भाजपच्या अनेक महिला खासदारांनी याबाबत स्वाक्षऱ्या करून केळी तक्रार अध्यक्षांकडे केली आहे. मात्र त्याची देखील पोलखोल झाली आहे. कारण तक्रारीत स्वाक्षरी करणाऱ्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी असा कोणताही प्रकार राहुल गांधी यांच्याकडून घडल्याचं आम्ही पाहिलं नाही असं त्या संसदेच्या बाहेर ऑन कॅमेरा बोलल्याने ते एक षडयंत्र किंवा पराचा कावळा करून केलेला आरोप होता अशी टीका होऊ लागली आहे. मात्र आता नेटिझन्स भाजपच्या कल्चरची पोलखोल करू लागले आहेत.

हा व्हिडिओ 17 ऑक्टोबरचा आहे. अमेरिकेला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री शिवराज मध्य प्रदेशातील अशोक नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. येथील एका कार्यक्रमात शिवराज आपल्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांना भेटत असताना एक कार्यकर्ता त्यांना सतत मामा-मामा म्हणत होता, मात्र गर्दीमुळे शिवराज यांना त्यांचे म्हणणे ऐकू येतं नव्हते.

यानंतर त्या कार्यकर्त्याने मुख्यमंत्री शिवराज यांना मामा म्हणून बोलावून ‘आय लव्ह यू’ म्हटले. हे ऐकताच शिवराज यांचे कार्यकर्त्याकडे गेले, त्याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री शिवराज यांनी ‘आय लव्ह यू टू’ असे म्हणत त्याला फ्लाइंग किस दिले. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. विशेष म्हणजे त्यावेळी गर्दीत समोर अनेक महिला कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या.

News Title : Viral Video MP CM Shivraj Singh Chauhan 10 August 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x