13 December 2024 3:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Genus Power Infra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! जीनस पॉवर शेअरने 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 665% परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस

Genus Power Infra Share price

Genus Power Infra Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्सवर गुंतवणूकदाराचे बारीक लक्ष आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 197.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे.

या कंपनीच्या शेअर्समधील ही तेजी नवीन ऑर्डर्स प्राप्त झाल्याने पाहायला मिळत आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीला स्मार्ट मीटर बसवण्यासाठी 2,209.84 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे. आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.22 टक्के घसरणीसह 190.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळी जवळ ट्रेड करत आहेत. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या ऑर्डर बुकचे एकूण मूल्य 8,200 कोटी रुपये आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.13 टक्के वाढीसह 197.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमधे हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 191 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 665.7 टक्के नफा कमावून दिला आहे. 7 ऑगस्ट 2020 रोजी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 25.8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जीनस पॉवर शेअर्सची किंमत 2023 हा वर्षात 130.49 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 159.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,049.70 कोटी रुपये आहे.

8 ऑगस्ट 2022 रोजी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअरने 72.55 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती. Tips 2 Trades फर्मच्या तज्ञांच्या मते, जीनस पॉवर स्टॉक दैनंदिन चार्टवर 195 रुपये किमतीवर रेझिस्टन्स दाखवत आहे.

पुढील काळात हा स्टॉक 209 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आणि खल्याच्या पातळीवर स्टॉकने 180.6 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट बनवला आहे. सेबीला दिलेल्या माहितीनुसार जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीला अॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करण्यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड प्रदान करण्यात आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Genus Power Infra Share price today on 10 August 2023.

हॅशटॅग्स

Genus Power Infra Share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x