19 April 2025 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Jay Bharat Maruti Share Price | अल्पावधीत पैसे दुप्पट करणारा जय भारत मारुती शेअर तेजीत, शेअरची कामगिरी तपासून घ्या

Jay Bharat Maruti Share Price

Jay Bharat Maruti Share Price | जय भारत मारुती लिमिटेड कंपनीच्या शेअरची सर्वत्र चर्चा होत आहे. कारण या कंपनीच्या शेअरने खूप कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. जय भारत मारुती लिमिटेड कंपनीच्या शेअरने फक्त 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा मिळवून दिला आहे.

सध्या या कंपनीचे शेअर्स चर्चा विषय बनले आहेत, कारण जय भारत मारुती लिमिटेड कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 ऑगस्ट 2023 रोजी जय भारत मारुती लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी जय भारत मारुती लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.44 टक्के घसरणीसह 299.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जय भारत मारुती लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपले 5 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स विभाजित करून त्यांना 2 रुपये दर्शनी मूल्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने अद्याप स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. मात्र पुढील काही दिवसांत कंपनी रेकॉर्ड डेट जाहीर करून गुंतवणूकदारांना शेअर विभाजनाचा लाभ मिळवून देईल.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जय भारत मारुती लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या कमजोरीसह 306.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी जय भारत मारुती लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करून होल्ड केले असते, ते तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1650 टक्क्यांनी वाढले असते.

जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते तर, आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 198 टक्के वाढले असते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 89.56 टक्के नफा कमावून दिला आहे. तर महील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 104.65 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jay Bharat Maruti Share Price today on 10 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jay Bharat Maruti Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या