28 November 2024 1:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Kotak Bank Salary Account | 99% सरकारी कर्मचाऱ्यांना 'या' योजनेची माहिती नाही, सॅलरी अकाउंटवर स्पेशल ऑफर - Marathi News Honda SP 125 on EMI | बाईक प्रेमींसाठी खुशखबर; केवळ 5000 भरा आणि बाईकचा ताबा मिळवा, एकाच वेळेला धावेल 700 KM Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: SUZLON RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL BEL Vs HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Business Idea | हा बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार करेल मदत; स्वतःचा व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवाल - Marathi News Home Loan Closer | होम लोन घेतलं असेल तर लक्ष द्या; क्लोज करताना काही महत्त्वाची कागदपत्र विसरू नका, महागात पडेल
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीची शानदार कामगिरी, नफ्यात भरघोस वाढ, शेअरची टार्गेट प्राईस किती? मल्टिबॅगरच्या दिशेने?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.87 टक्क्यांच्या वाढीसह 241.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र टाटा पॉवर स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. टाटा पॉवर कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही काळात कंपनीच्या नफ्यात मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे.

एप्रिल ते जून 2023 या तिमाही कालावधीत टाटा पॉवर कंपनीने 29 टक्के वाढीसह 1,140.97 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. CLSA फर्मने टाटा पॉवर स्टॉकवर 195 लक्ष किमतीसह स्टॉक सेल करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.30 टक्के घसरणीसह 236.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महाराष्ट्र सरकारसोबत करार :

टाटा पॉवर कंपनीने नुकताच महाराष्ट्र सरकारसोबत एक करार केला आहे. या करारानुसार टाटा पॉवर कंपनीने महाराष्ट्रात पंप हायड्रो स्टोरेजशी संबंधित दोन प्रकल्पांमध्ये 13,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाची एकूण क्षमता 2,800 मेगावॅट असणार आहे आणि या दोन्ही प्रकल्पांद्वारे एकूण 6000 लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

जून 2023 तिमाहीचे निकाल या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 29 टक्क्यांच्या वाढीसह 1,140.97 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 883.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

सेबीला दिलेल्या माहितीत टाटा पॉवर कंपनीने कळवले आहे की, जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने एकूण 15,484.71 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील.आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीने 14,638.78 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

टाटा पॉवर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जून तिमाहीतील उत्कृष्ट कामगिरीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने राबवलेले प्रभावी धोरण आणि त्यांची कार्यक्षमता, तसेच वचनबद्ध कार्यबल आहे. टाटा पॉवर कंपनीची एकूण स्थापित ऊर्जा निर्मिती क्षमता 14,319 मेगावॅट असून यात सर्व उपकंपन्या आणि संयुक्तपणे नियंत्रित पॉवर प्लांटची ऊर्जा निर्मिती क्षमता सामील आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price today on 11 August 2023

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x