23 November 2024 7:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Taylormade Share Price | अबब! टेलरमेड शेअरने 1 वर्षात गुंतवणुकीवर 50 पट परतावा दिला, 4500% परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती

Taylormade Share Price

Taylormade Share Price | टेलरमेड रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मंदी असताना देखील टेलरमेड रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 591 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आज देखील हा स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. टेलरमेड रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 581 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी टेलरमेड रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 621.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात टेलरमेड रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 12.26 रुपये या नीचांक किमतीवरून, वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. मागील 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांनी 50 पट अधिक नफा कमावला आहे. जर तुम्ही मागील वर्षी 11 ऑगस्ट 2022 रोजी टेलरमेड रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 50 लाख झाले आहे.

टेलरमेड रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला आंध्र प्रदेश सरकारच्या सार्वजनिक आरोग्य आणि अभियांत्रिकी विभागाकडून 273 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरमध्ये पाण्याच्या निचरा नेटवर्कचे बांधकाम, आउट-कॉल्स आणि सीरिज कास्ट सीवेज ट्रीटमेंट प्लांट, ईपीसी मोड अंतर्गत कामे करायची आहेत. या ओर्डरची पूर्तता पुढील 24 महिन्यांत पूर्ण करायची आहे. आणि ऑर्डरचे एकूण मूल्य 159 कोटी रुपये आहे.

टेलरमेड कंपनीला मिळालेल्या दुसऱ्या ऑर्डरमध्ये पाणी पुरवठा वितरण पाईपलाईनचे रीमॉडेलिंग करणे, आणि एएलएसआर संबंधित बांधकामाचा समावेश आहे. जल जीवन मिशन अभियानांतर्गत टेलरमेड रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीला मिळालेल्या ओर्डरचे एकूण मूल्य 114 कोटी रुपये आहे. Taylor Made Renewables ही कंपनी मुख्यतः कचरा व्यवस्थापन करण्याचे काम करते. या कंपनीने विषारी कचरा आणि पाण्यावर शून्य द्रव विसर्जनासह प्रक्रिया करण्याचा एक अभिनव मार्ग विकसित केला आहे.

टेलरमेड रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 523.64 टक्के नफा कमावून दिला आहे. 10 फेब्रुवारी 2023 रोजी टेलरमेड रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 621 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 1 महिन्यात टेलरमेड रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 54.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 13 रुपये किमतीवर हा स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4500 टक्के वाढले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Taylormade Share Price today on 11 August 2023.

हॅशटॅग्स

Taylormade Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x