27 November 2024 11:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | आजचा दिवस अनेक व्यक्तींसाठी आहे खास; काहींना करावं लागेल हे एक काम, दिवस आनंदात जाईल Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 2 दिवसात 20% वाढला, दुसरी अपडेट आली, स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: IDEA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा
x

एक राज्य 3 महिने जळतंय, महिला-मुलांना ठार केलं जातंय, यावर संसदेत देशाचे पंतप्रधान 2 तास हसत-विनोद करत कसे भाषण करू शकतात? - राहुल गांधी

Rahul Gandhi

Rahul Gandhi | एनडीए सरकारविरोधात विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत असताना संसदेत हसणे मला शोभत नाही. मणिपूरमधील परिस्थितीवर संसदेत अविश्वास ठरावाचा निकाल पार पडल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, पंतप्रधानांनी लोकसभेत दोन तासांहून अधिक काळ केलेल्या भाषणात मणिपूरवर केवळ दोन मिनिटे भाषण केले आणि या भाषणात ते हसत-विनोद करत बोलत होते हे क्लेशदायक आहे असं त्यांनी म्हटलं.

काल पंतप्रधानांनी लोकसभेत दोन तास १३ मिनिटांचे भाषण केले, पण मणिपूरवर केवळ दोन मिनिटे बोलले. मणिपूरमध्ये अनेक महिन्यांपासून आग लागली आहे, लोक मारले जात आहेत, बलात्कार केले जात आहेत, लहान मुले मारली जात आहेत आणि पंतप्रधान हसत बोलत होते. ते अनेकदा हसत होते. ते गंमत देखील करत होते. हे भारताच्या पंतप्रधानांना शोभत नाही. मुद्दा काँग्रेस किंवा माझा नव्हता, मुद्दा होता मणिपूरमध्ये काय चालले आहे? आणि ते का थांबवले जात नाही?

पंतप्रधानांना मणिपूरमधील आग विजू नये अशीच त्यांची इच्छा होती

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली, हे त्यांनी सभागृहात केलेले वक्तव्य केवळ पोकळ शब्द नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले. मणिपूरमध्ये भाजपने हिंदुस्थानची हत्या केली आहे. पंतप्रधानांना मणिपूरमधील आग विजू नये अशीच त्यांची इच्छा होती, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. भारतीय लष्करावर मला विश्वास आहे आणि लष्कर दोन-तीन दिवसांत शांतता प्रस्थापित करू शकते, पण मोदी सरकारला ते करायचे नाही असं देखील त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मी जवळपास 19 वर्षांपासून राजकारणात आहे आणि मी जवळजवळ सर्व राज्यांना भेटी दिल्या आहेत, परंतु मणिपूरमध्ये मी जे पाहिले आणि ऐकले ते अभूतपूर्व आहे. भारताचे पंतप्रधान मणिपूरबद्दल संसदेत जसे बोलले तसे कसे बोलू शकतात हे मला समजत नाही.

संसदेच्या कामकाजाच्या रेकॉर्डमधून पहिल्यांदाच ‘भारतमाता’ हा शब्द काढून टाकण्यात आला

मणिपूरमध्ये अनेक महिन्यांपासून आग लागली आहे आणि तेथील लोकांचा मृत्यू झाला आहे, याचा पंतप्रधानांना विसर पडलेला दिसतो. संसदेच्या कामकाजाच्या रेकॉर्डमधून पहिल्यांदाच ‘भारतमाता’ हा शब्द काढून टाकण्यात आला, हा अपमान आहे, असेही काँग्रेस खासदार म्हणाले. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवत म्हटले की, त्यांनी भारत मातेचा उल्लेख केला होता, जो नंतर संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला.

त्या राज्यात फूट पडली

मणिपूरमध्ये कुकी लोकं मैतेई लोकांना बघताच गोळी घालत आहेत, तर मैतेई लोकं कुकी लोकांना बघताच गोळी घालत आहेत. या हिंसाचाराने मणिपूरचे दोन तुकडे झाले आहेत आणि त्या राज्यात फूट पडली आहे आणि त्यामुळेच मी म्हणालो की मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या करण्यात आली आहे आणि आपल्या एकतेची देखील हत्या झाली आहे, असे ते म्हणाले. कारण आम्हाला माहित असलेले मणिपूर आता अस्तित्वात नाही.

भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास

‘भारतमाते’वर जिथे आणि जेव्हा हल्ला होईल, तेव्हा तुम्हाला मी तिथे उभा दिसेन. माझा भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास आहे, सर्वांना माहित आहे की, विचारताच मणिपूरमधील हिंसाचार त्याच वेळी थांबवू शकतो, पण सरकार तसे करत नाही. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना मणिपूरला भेट देण्याचे आवाहन केले. मणिपूरमधील हिंसाचार पंतप्रधान ताबडतोब थांबवू शकतात, पण ते तसे करत नाहीत; त्यांनी निदान तिथे तरी जायला हवं.

News Title : Rahul Gandhi Press conference says on Manipur 11 August 2023.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x