23 November 2024 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 40 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, स्टॉक डिटेल्स नोट करा

Stocks To Buy

Stocks To Buy | चालू आठवड्यात शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. सेन्सेक्समध्ये 300 अंकांच्या घसरणीसह लाल निशाणीवर ट्रेड करत होता. तर निप्टी इंडेक्स 19500 च्या खाली आला होता. शेवटच्या दोन दिवसांत मिडकॅप इंडेक्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग सुरू होती आणि NIFTY मिडकॅप 100 इंडेक्स 100 अंकांच्या घसरणीसह 37900 अंकांवर ट्रेड करत होता.

पडत्या काळात शेअर बाजारात कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी याबाबत लोकांमध्ये संभ्रम असतो, म्हणून तज्ञांनी टॉप 3 शेअरची निवड केली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ डिटेल.

तत्व चिंतन लिमिटेड :

शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2650 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1600 रुपये होती. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये या कंपनीच्या शेअरचा EPS म्हणजेच शेअरवरील कमाई रु.67 टक्के असण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या कंपनीचा EPS 18 टक्केवर आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये पुढील 9-12 महिन्यांसाठी 2345 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना अल्पावधीत 40 टक्के नफा मिळवू शकतो.

नुकताच या कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. कंपनीची निव्वळ विक्री 29.3 टक्क्यांच्या वाढीसह 114.3 कोटी रुपयेवर पोहोचलो आहे. तर जून तिमाहीत कंपनीने 9.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 1,693.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सुंदरम फास्टनर्स :

शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सुंदरम फास्टनर्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1275 रुपये होती. तर नीचांकी पातळी किंमत 800 रुपये होती. ही कंपनी मुख्यतः आपल्या ग्राहकांना ऑटोमोटिव्ह, पायाभूत सुविधा, पवनचक्की आणि विमान वाहतूक क्षेत्रात वापरली जाणारी उत्पादने पुरवण्याचे काम करते. या कंपनीचे ग्राहक भारतासहित जगभरात चीन, जर्मनी, अमेरिका, यूके, इटली, फ्रान्स, ब्राझीलमध्ये पसरले आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर पुढील 3-6 महिन्यांसाठी 1435 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच गुंतवणुकदारांना अल्पावधीत 20 टक्के परतावा मिळू शकतो. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के घसरणीसह 1,199.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

हर्षा इंजिनियर्स :

शेअर बाजारातील या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ही कंपनी मुख्यतः अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अचूक बियरिंग्ज तयार करण्याचे काम करते. यासह ही कंपनी ब्रास केग्स, स्टील केग्स आणि पॉलिमाइड केग्स बनवण्याचे काम देखील करते. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर पुढील 1-3 महिन्यांसाठी 475 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के वाढीसह 419.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 12 August 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x