22 November 2024 10:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Samvardhana Share Price | अल्पावधीत पैसा! संवर्धन मदरसन इंटरनॅशनल शेअर्सनी अल्पावधीत 50% परतावा दिला, शेअरची किंमत दोन आकडी

Samvardhana Motherson Share Price

Samvardhana Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 28 मार्च 2023 रोजी 63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 96 रुपयेवर पोहचला आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल एकूण 6500 कोटी रुपये आहे.

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 103 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 61.80 रुपये होती. आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 1.28 टक्के घसरणीसह 96.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आज बुधवारी शेअर 0.10 टक्के घसरणीसह 96.40 रुपयांवर ट्रेड करत आहे.

संवर्धन मदरसन कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये संवर्धन मदरसन कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 103 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने आपले चालू आर्थिक वर्षाचे जून तिमाहीचे आर्थिक निकाल घोषित केले. संवर्धन मदरसन कंपनीने जून तिमाहीत 326 टक्के वाढीसह 601 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. संवर्धन मदरसन कंपनीने जून तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत 27 टक्के वाढीसह 22462 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत, संवर्धन मदरसन कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन महसुलात जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे. इलेक्ट्रिक वाहन विभागात कंपनीने 1600 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. संवर्धन मदरसन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 0.65 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. संवर्धन मदरसन कंपनी ऑटोमोटिव्ह क्षेत्रात उपकरणे बनवण्याचे काम करते. मागील 1 वर्षात संवर्धन मदरसन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Samvardhana Motherson Share Price today on 16 August 2023.

हॅशटॅग्स

Samvardhana Motherson Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x