23 November 2024 6:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, या बातमीने तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस, पहा पुढे काय होणार?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | ब्रोकरेज हाऊस शेअरखानने टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. टाटा पॉवर कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

जून 2023 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 22 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या उत्पन्नात आणि नाफ्यात मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 245 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 2.14 टक्के घसरणीसह 231.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

टाटा पॉवर शेअर टार्गेट प्राईस :

ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या तज्ञांच्या मते टाटा पॉवर स्टॉक पुढील काळात 265 रुपयेवर जाऊ शकतो. 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 237 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मैथल पॉवर प्रोजेक्टमध्ये टाटा पॉवर कंपनीने बोली लावली होती, असे दलालांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे, मुंद्रा UMPP मधील अंडर-रिकव्हरी अंतर्गत मिळालेले 102 कोटी रुपये आणि टाटा कंपनीच्या प्रोजेक्टमधील हिस्सा कमी केल्याने कंपनीच्या नफ्यात 235 कोटी रुपयेची भर पडली आहे.

नुकताच टाटा पॉवर कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत 2,800 मेगावॅट क्षमतेच्या पंपयुक्त हायड्रो स्टोरेज प्रकल्पाचे काम करण्यासाठी व्यापारी सामंजस्य करार केला असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय, कंपनीचा ओडिशा डिस्कॉम व्यवसाय स्थिर झाला असून पुढील तिमाहीत त्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

टाटा पॉवर कंपनीची एकूण वीज निर्मिती क्षमता 14,294 मेगावॅट आहे. तर कंपनीची देशभरात एकूण थर्मल पॉवर क्षमता 8,860 मेगावॅट आहे. याशिवाय कंपनीची पवन ऊर्जा निर्मिती क्षमता 835 मेगावॅट आहे. आणि सौरऊर्जा निर्मिती क्षमता 2917 मेगावॅट, हायड्रो पॉवर निर्मिती क्षमता 880 मेगावॅट आणि हायब्रीड पॉवर निर्मिती क्षमता 3590 मेगावॅट आहे.

टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 2023 या वर्षात फक्त 12 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 245 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 75000 कोटी रुपये असून कंपनीवर एकूण 37749 कोटी रुपये कर्ज आहे.

टाटा पॉवर कंपनीने जून 2023 तिमाहीत अतिरिक्त 235 कोटी रुपये कमावले आहे. टाटा पॉवर कंपनीने टाटा समूहाच्या मालकीच्या प्रकल्पातील आपला हिस्सा विकून 47.78 टक्क्यांवरून कमी करून 30.81 टक्के केला आहे. यामुळे कंपनीला 235 कोटी अतिरीक्त उत्पन्न मिळाले आहे.

टाटा पॉवर कंपनीने जून 2022 तिमाहीमध्ये 972 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या तुलनेत या कंपनीच्या शेअरमध्ये 22 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. जून 2022 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 15213 कोटी रुपये महसूल संकलित केले होते. मागील वर्षी जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचा EBITDA 75 टक्क्यांच्या वाढीसह 2,944 कोटी रुपयेवर पोहचला होता. तर मार्जिन 11.6 टक्क्यांवरून वाढून 19.4 टक्क्यांवर पोहचला होता.

यावर्षी जून 2023 तिमाहीत टाटा पॉवर कंपनी29 टक्क्यांच्या वाढीसह 1141 कोटी रुपये PAT कमावला आहे. या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचा EBITDA 43 टक्क्याच्या वाढीसह 3005 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील सलग 15 तिमाहीपासून टाटा पॉवर कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ पाहायला मिळत आहे. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price today on 14 August 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x