6 January 2025 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Gujarat Health Services | गुजरातमधील खासगी केंद्रांमधील डायलिसिस सेवा 3 दिवसांसाठी बंद, रुग्णांचे हाल, PM योजनेवरून प्रचंड नाराजी

Gujarat Health Services

Gujarat Health Services | पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत (पीएम-जेएवाय) रुग्णांना देण्यात येणारे दर कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ गुजरातमधील खासगी केंद्रांनी तीन दिवसांपासून डायलिसिस बंद ठेवले आहे. खासगी केंद्रांचा विरोध लक्षात घेता रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था केली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी दिली. सरकारने हेल्पलाईन क्रमांकही सुरू केला आहे.

गुजरात नेफ्रोलॉजिस्ट असोसिएशनचे सदस्य डॉ. उमेश गोधनी यांनी सांगितले की, राज्यात पीएम-जेएवाय योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे १.३० कोटी डायलिसिस केले जातात, त्यापैकी ८० टक्के डायलिसिस खासगी केंद्रांद्वारे केले जाते. पीएम-जेएवाय योजनेअंतर्गत 1.27 लाख लाभार्थी डायलिसिस करतात आणि त्यापैकी सुमारे एक लाख रुग्णांना खासगी केंद्रांमधून ही सुविधा मिळते.

डॉ. गोधनी म्हणाले की, राज्य सरकार गेल्या आठ वर्षांपासून खासगी केंद्रांना डायलिसिससाठी दोन हजार रुपये देत होते, ते आता कमी करून १६५० रुपये करण्यात आले आहे, विशेषत: उपचारांचा वाढता खर्च लक्षात घेता त्यांच्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. ज्या रुग्णांचे मूत्रपिंड काम करत नाही अशा रुग्णांचे डायलिसिस केले जाते.

गेल्या आठ वर्षांत उपचारांचा खर्च वाढला असून ही रक्कम वाढवायला हवी, पण उलट सरकारने खासगी रुग्णालयांना (पीएम-जेएवाय योजना) माहिती न देता ही रक्कम कमी करून १६५० रुपये केली, असे डॉ. गोधनी म्हणाले. सर्व प्रयत्न करूनही संघटनेचे शिष्टमंडळ राज्याचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटू शकले नाही.

सरकारने तीन दिवसांत आमच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यातील सर्व १२० नेफ्रोलॉजिस्ट पीएम-जेएवाय योजनेतून आपली नावे मागे घेतील, असा इशारा डॉ. गोधनी यांनी दिला आहे.

‘ए-वन डायलिसिस’ कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारने तालुकास्तरावर २७२ मोफत डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याशिवाय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत डायलिसिसची सुविधाही दिली जात आहे. तीन दिवस खासगी केंद्रातील डायलिसिस बंद असल्याने रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

News Title : Gujarat Health Services private centres stop dialysis services for 3 days 15 August 2023.

हॅशटॅग्स

#Gujarat Health Services(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x