18 November 2024 10:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत खुशखबर! शेअरची म्युचुअल फंड ते QIP गुंतवणूकदारांकडून खरेदी, शेअरचं पुढे नेमकं काय होणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 20 रुपये किमतीजवळ ट्रेड करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात. नुकताच या कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. (Suzlon Energy Share Price)

QIP द्वारे 2000 कोटी रुपये भांडवल उभारणी

सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे आगमन होणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाने 8 ऑगस्ट 2023 रोजी QIP द्वारे 2000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली होती. ही डील 18.44 रुपये प्रति शेअरवर होणार आहे. आज गुरूवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी 3.21 टक्के घसरणीसह 19.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

QIP गुंतवणूकदार गुंतवणूक करणार

सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये QIP गुंतवणूकदार 18.44 रुपये किमतीवर गुंतवणूक करणार आहेत. यावरून असे कळते की, ही किंमत स्टॉकसाठी एक मजबूत आधारभूत किंमत म्हणून काम करू शकते. यासह शारेच्या लक्ष किंमतमध्ये देखील लक्षणीय उसळी पाहायला मिळू शकते. प्राइम डेटाबेसने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल-जून 2023 च्या तिमाहीत, HNI नी सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये 271 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये गुंतवणूकीचा ओघ असाच सुरू आहे. याचा सकारात्मक परिणाम शेअरच्या किमतीवर देखील पाहायला मिळू शकतो.

म्युच्युअल फंड कंपन्यांकडून गुंतवणूक करायला सुरुवात

याशिवाय आणखी एक सकारात्मक बातमी अशी की, गुंतवणूक बाजारातील अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी देखील सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. म्युच्युअल फंड कंपन्या सहसा तेव्हाच गुंतवणूक करतात जेव्हा, कंपनीच्या शेअरमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत मिळत असतात. जुलै 2023 मध्ये UTI म्युच्युअल फंडने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. त्याआधी पासून देखील काही म्युच्युअल फंड कंपन्यांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स होल्ड केले आहेत.

मागील 3 महिन्यांत शेअरने 150 टक्के परतावा दिला

प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर तेजीच्या काळात 25 रुपयेपर्यंत वाढू शकतात. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 14 टक्के वाढली आहे. तर मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 162 टक्के वाढली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 83.64 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Suzlon Share Price today on 17 August 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(257)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x