12 December 2024 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत मोठी अपडेट! या बातमीचा शेअरवर काय परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय म्हटले?

IRFC Share Price

IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 52.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र स्टॉकमध्ये लोअर सर्किट लागला आहे. भारत सरकार चालू आर्थिक वर्षात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकणार आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीमध्ये भारत सरकारची 86.36 टक्के मालकी आहे.

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन ही कंपनी भारतीय रेल्वेची वित्त फंडिंग करणारी शाखा म्हणून काम करते. ही कंपनी रोलिंग स्टॉक/प्रोजेक्ट मालमत्तेचे संपादन आणि बांधणी करण्यासाठी वित्त बाजारातून भांडवल उधार घेते. आणि या मालमत्ता नंतर भारतीय रेल्वेला भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी दिल्या जातात. आज गुरूवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 4.78 टक्के घसरणीसह 48.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारत सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग आणि रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मिळून बनलेले इंटर मिनिस्ट्रियल ग्रुपने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स विकण्यासाठी आणि त्याचे प्रमाण निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे.

सेबी द्वारे घालून देण्यात आलेली किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग मर्यादा पूर्ण भारत सरकारला इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे किमान 11.36 टक्के भाग भांडवल विकून आपला हिस्सा कमी करावा लागणार आहे. MPS नियमांनुसार गुंतवणुकदार संस्थेला स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत किमान 25 टक्के सार्वजनिक शेअर होल्डिंगची आवश्यकता पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

सध्याच्या बाजारभावानुसार भारत सरकारला इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे 11.36 टक्के भाग भांडवल विकून 7,600 कोटी रुपये मिळतील. मागील एका महिन्यात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 58.77 टक्के नफा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 56.84 टक्के वाढवले आहे. मागील एका महिन्यात IRFC कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 141.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 21 रुपयांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे.

IRFC कंपनीच्या शेअरमधील तेजीमुळे या कंपनीने बाजार भांडवल क्रमवारीत खाजगी नॉन बँकिंग फायनान्स कंपनी श्रीराम फायनान्स आणि खाजगी क्षेत्रातील बँक IDBI बँकेल देखील मागे टाकले आहे. मागील आठवड्यात IRFC कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होत.

या जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 6.3 टक्के कमी झाला आहे. मात्र कंपनीने 1,661.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या मार्च तिमाहीचे तुलनेत 17.2 टक्क्यांनी वाढला होता. आणि कंपनीने 1,327.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

जून 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 18.7 टक्के वाढीसह 6,679.2 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर जून 2022 तिमाहीत कंपनीने 5,627.4 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जो आता जून 2023 तिमाहीत वाढून 6,681.0 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price today on 17 August 2023.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(110)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x