26 November 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपला सुपडा साफ होण्याची भीती, 3 महिने आधीच उमेदवार जाहीर केले

BJP Madhya Pradesh and Chattisgarh

BJP Madhya Pradesh and Chattisgarh | मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष आणि स्थानिक नेत्यांचे आश्वासक चेहरे असल्याने या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची अवस्था कर्नाटक निवडणुकीप्रमाणे होईल असे संकेत अनेक सव्हेमध्ये समोर आले आहेत. स्थानिक राजकीय तज्ज्ञांनी देखील या दोन्ही राज्यात काँग्रेस सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे छत्तीसगड मध्ये भाजपकडे स्थानिक चेहरेच नसल्याने आणि पक्ष संघटन अत्यंत कमकुवत आणि गटातटाचे असल्याने छत्तीसगड विधानसभा निवडणूक भाजपाला जवळपास अशक्य असल्याचं म्हटलं जातंय. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची हवा असल्याने अनेक भाजप नेते काँग्रेसच्या वाटेवर असल्याने भाजपने ३ महिने आधीच या राज्यांमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीअंतर्गत मध्य प्रदेशात ३९ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय छत्तीसगडमधील २१ उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. मध्य प्रदेशात भाजपने जाहीर केलेल्या ३९ उमेदवारांपैकी तीन महिला आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे नाव पहिल्या यादीत नाही. सीहोर जिल्ह्याचा भाग असलेल्या बुधनी मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत.

भाजपने सतना जिल्ह्यातील चित्रकूट मतदारसंघातून सुरेंद्र सिंह गहरवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. याशिवाय छतरपूर मतदारसंघातून ललिता यादव यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. सुमावलीतून अदलसिंग कंसाना आणि पिचोरमधून प्रीतमसिंग लोधी यांना संधी मिळाली आहे. प्रीतमसिंह लोधी हे ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांचे निकटवर्तीय मानले जातात. गोहाड राखीव मतदारसंघातून लालसिंह आर्य निवडणूक लढवणार आहेत. ते भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्षही आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस ओमप्रकाश धुर्वे यांना शहापुरा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रियांका मीणा यांना चाचौडा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

News Title : BJP Madhya Pradesh and Chattisgarh candidates list announced 17 August 2023.

हॅशटॅग्स

#BJP Madhya Pradesh and Chattisgarh(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x